विजय देवरकोंडाच्या आई-बाबांना भावी सूनबाईंकडून आहेत 'या' अपेक्षा, म्हणाले-"त्याचं काम समजून घेणारी..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2026 11:37 IST2026-02-24T11:31:50+5:302026-02-24T11:37:08+5:30
"त्याला ज्या मुलीशी लग्न कराचंय ते करावं, पण..." विजय देवरकोंडाचे आई-वडील स्पष्टच म्हणाले, लग्नाच्या धामधुमीत 'तो' व्हिडीओ चर्चेत

विजय देवरकोंडाच्या आई-बाबांना भावी सूनबाईंकडून आहेत 'या' अपेक्षा, म्हणाले-"त्याचं काम समजून घेणारी..."
Vijay Deverkonda And Rashmika Mandanna: दाक्षिणात्य सिनेसृ्ष्टीतील लोकप्रिय अभिनेता विजय देवरकोंडा आणि अभिनेत्री रश्मिका मंदाना गेल्या काही दिवसांपासून सातत्याने चर्चेत आहेत. लवकरच हे दोघे लग्नाच्या पवित्र बंधनात अडकणार आहेत. बऱ्याच काळापासून सुरू असलेल्या लग्नाच्या चर्चांवर आता या जोडप्याने स्वतः शिक्कामोर्तब केलं आहे. रश्मिका आणि विजयने दोघांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करून त्यांच्या लग्नाची अधिकृतपणे घोषणा केली. ‘Virosh’ म्हणत त्यांनी आपलं नातं जगजाहीर केलं.हे जोडपं २६ फेब्रुवारी २०२६ रोजी उदयपूरमध्ये लग्न करणार असल्याचं म्हटलं जात आहे.
'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' कोण?... क्लिक करून आपलं मत नोंदवा!
दरम्यान,अशातच सोशल मीडियावर विजय देवरकोंडाच्या पालकांचा एक जुना व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये त्यांनी विजयसाठी त्यांना कशी मुलगी हवीये तसेच होणाऱ्या सूनेकडून त्यांना काय अपेक्षा असतील... याबद्दल त्यांनी अगदी मनमोकळेपणाने सांगितलं होतं. हा व्हिडिओ गीता गोविंदम सिनेमाच्या सक्सेस पार्टीतला आहे. त्यादरम्यान, विजयच्या पालकांना विचारण्यात आलं होतं की त्यांना कशी सून हवी आहे? यावर विजयच्या आईचे मनापासून उत्तर देत त्यांनी एक आपली अट असल्याचंही सांगितलं.
They imagined the perfect daughter-in-law… Rashmika is their dream come true ❤️#VijayDeverakonda#RashmikaMandanna#Viroshpic.twitter.com/eq3a1NwyTd
— Lilly ✨ (@therwdygirl) February 21, 2026
काय होती ती अट?
या अटीबद्दल बोलताना,"विजयच्या आईने म्हटलं होतं... त्यांच्या भावी सुनेने विजयची चांगली काळजी घ्यावी आणि त्याच्यावर निस्वार्थपणे प्रेम करावं. विजय चित्रपट इंडस्ट्रीशी जोडलेला आहे त्यामुळे त्या मुलीने त्याचं काम आणि जीवनशैली समजून घ्यावी, असेही त्यांनी म्हटलं होतं.
तर विजयचे बाबा म्हणालेले...
विजयच्या वडिलांनी सांगितलेलं की ते त्यांच्या मुलाला ज्या मुलीशी लग्न कराचंय ते त्याने करावं,पण तो आयुष्यभऱ सुखी राहावा हीच माझी अपेक्षा आहे. यावेळी त्यांनी असंही म्हटलं... त्यांना जात किंवा धर्माची पर्वा नाही, परंतु जर त्यांनी भारतीय, विशेषतः दक्षिण भारतीय मुलीशी लग्न केलं तर त्यांना याचा आणखी आनंद होईल."
विजय आणि रश्मिका यांची जोडी ही अनेकांना आवडते. दोघांनी 'गीता गोविंदम' आणि 'कॉमरेड' या चित्रपटांमध्ये एकत्र काम केलं आहे. या सुंदर जोडप्याचे दोन्ही चित्रपट सुपरहिट ठरले आहेत. तेव्हापासून दोघेही त्यांच्या नात्यामुळे चर्चेत आहेत.