नवऱ्यानंतर आता ड्रेसही चोरला... नागा चैतन्यची पत्नी शोभितावर भडकले समांंथाचे चाहते

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2025 16:43 IST2025-03-21T16:42:57+5:302025-03-21T16:43:10+5:30

समांथासारखाच ड्रेस कॉपी केल्यानं तिला ट्रोलिंगचा सामना करावा लागतोय. 

Sobhita Dhulipala Trolled For Copying' Samantha Ruth Prabhu Dress While Shoot For Vogue With Naga Chaitanya | नवऱ्यानंतर आता ड्रेसही चोरला... नागा चैतन्यची पत्नी शोभितावर भडकले समांंथाचे चाहते

नवऱ्यानंतर आता ड्रेसही चोरला... नागा चैतन्यची पत्नी शोभितावर भडकले समांंथाचे चाहते

अभिनेत्री आणि त्यांची फॅशन स्टाइल याकडे सर्वांच्या नजरा खीळलेल्या असतात. त्यातल्या त्यात अभिनेत्रींचे ड्रेसेस यांवर तर नेहमीच चर्चा रंगलेल्या असतात. त्यामध्ये ड्रेसेसची किंमत, पॅटर्न यांचा समावेश असतो. चुकूनही एखाद्या अभिनेत्रीचा ड्रेस रिपीट झाला किंवा लूक कॉपी झाला की लगेचच त्यावरून चर्चांना उधाण येतं. असंच काही झालं आहे अभिनेत्री शोभिता धुलिपाला (Sobhita Dhulipala) हिच्यासोबत. यामुळे ती सध्या नेटकऱ्यांच्या निशाण्यावर आली आहे. 

 नुकतंच शोभिता आणि नागा चैतन्य (Naga Chaitanya) यांनी व्होग मासिकाच्या कव्हर पेजसाठी फोटोशूट केलं. यावेळी शोभिताने निळ्या रंगाच्या हायलाइट्स असलेला चंदेरी रंगाचा ड्रेस परिधान केला होता. यावेळी शोभितेच्या ड्रेसने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं.  शोभिताने जो ड्रेस परिधान केलाय, तसाच ड्रेस याआधी अभिनत्री समांथा (Samantha Ruth Prabhu) हिनं परिधान केला होता. शोभितानं आपल्या पतीच्या पुर्व पत्नी समांथाची कॉपी केल्याचं चाहते म्हणत आहेत. समांथासारखाच ड्रेस कॉपी केल्यानं तिला ट्रोलिंगचा सामना करावा लागतोय. 


समांथा आणि शोभिता यांच्या ड्रेसमध्ये लक्ष देऊन पाहिल्यास थोडासा फरक दिसतो. पण, ड्रेसचा खालचा भाग जवळपास सारखाच आहे. त्यामुळे नेटकऱ्यांनी  शोभिताला ट्रोल केलं आहे. एका युजरने कमेंट करत लिहलं, 'नवऱ्यानंतर आता ड्रेसही चोरला'. तर आणखी एकाने लिहलं, 'शोभिताने आता समंथाची कॉपीही करायला सुरुवात केली'. 


नागा चैतन्य आणि शोभिता धुलिपाला यांचा विवाह गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात झाला. यापूर्वी नागा चैतन्यने सामंथा रुथ प्रभूसोबत लग्न केलं होतं. पण, लग्नाच्या ४ वर्षामध्ये त्यांचा संसार मो़डला. या जोडीची प्रचंड फॅन फॉलोविंग होतं. समांथा आणि नागा चैत्यन यांच्या घटस्फोट झाल्यानंतर चाहत्यांना प्रचंड दु:ख झालं होतं. अनेकांनी तर शोभितावर घर फोडणारी स्त्री असा आरोपही केलाय. 
 

Web Title: Sobhita Dhulipala Trolled For Copying' Samantha Ruth Prabhu Dress While Shoot For Vogue With Naga Chaitanya

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.