प्लास्टिक सर्जरीची दुकान म्हणणाऱ्यांना श्रुती हासनचं सडेतोड उत्तर; म्हणाली, "किंमत चुकवावी..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2025 15:38 IST2025-08-20T15:36:53+5:302025-08-20T15:38:10+5:30
काय म्हणाली श्रुती हासन?

प्लास्टिक सर्जरीची दुकान म्हणणाऱ्यांना श्रुती हासनचं सडेतोड उत्तर; म्हणाली, "किंमत चुकवावी..."
साऊथ सुपरस्टार थलायवा रजनीकांत यांचा 'कुली' सिनेमा नुकताच रिलीज झाला आहे. रजनीकांत यांचा सिनेमा म्हटलं की कमालीची क्रेझ असतेच. या सिनेमात कमल हासन यांची मुलगी श्रुती हासनचीही (Shruti Haasan) भूमिका आहे. श्रुती हासनला अनेकदा प्लास्टिक सर्जरीवरुन टोमणे मारले जातात. बऱ्याच वेळा ती ट्रोल झाली आहे. मात्र श्रुती प्रत्येक वेळी रोखठोक उत्तर देताना दिसते. आताही तिने प्लास्टिक सर्जरीची दुकान म्हणणाऱ्यांना सडेतोड उत्तर दिलं आहे.
टीएचआर इंडियाशी बोलताना श्रुती म्हणाली, "कॉस्मॅटिक सर्जरीवरुन माझ्यावर बरेचदा टीका झाली. जेव्हा मी याविरोधात आवाज उठवला तेव्हा कमेंट्स आल्या की,'ओह, ही तर प्लास्टिक सर्जरीची दुकान आहे'. पण मला माहितीये की मी नक्की काय केलंय आणि किती केलंय. तसंच दुसऱ्यांनीही किती काय काय केलंय याची मला कल्पना आहे. प्रामाणिकपणाची इथे किंमत चुकवावी लागते. ठीकच आहे. मी कधीच याचं प्रमोशन करत नाही. हा माझा निर्णय आहे. मला कोणावर लादायचा नाही."
ती पुढे म्हणाली, "प्रेमात, आयुष्यात, कामात जर तुम्ही खरं बोलत असाल किंवा कोणाचं सत्य सांगत असाल तर नेहमीच तुमच्यावर बोट दाखवलं जातं. याची किती चांगली किंमत चुकवावी लागते. "
श्रुती हासन सध्या 'कुली' सिनेमाचं यश एन्जॉय करत आहे. लोकेश कनगराज यांनी सिनेमा दिग्दर्शित केला आहे. हा एक अॅक्शन थ्रिलर आहे. देशातच का परदेशातही या सिनेमाची हवा आहे. १४ ऑगस्ट रोजी रिलीज झालेल्या या सिनेमाने आतापर्यंत दगभरात ४०० कोटींचा गल्ला जमवला आहे.