ये बात! नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच प्रभास-तृप्ती डिमरीचं चाहत्यांना खास सरप्राईज; 'स्पिरिट'चं पहिलं पोस्टर आलं समोर
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2026 09:04 IST2026-01-01T09:01:55+5:302026-01-01T09:04:11+5:30
नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच प्रभास-तृप्ती डिमरीने चाहत्यांना दिला सुखद धक्का; शेअर केली 'स्पिरिट'मधील पहिली झलक

ये बात! नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच प्रभास-तृप्ती डिमरीचं चाहत्यांना खास सरप्राईज; 'स्पिरिट'चं पहिलं पोस्टर आलं समोर
Prabhas Spirit First Look Out: टॉलिवूड ते बॉलिवूडपर्यंत प्रवास करत यशस्वी झालेल्या कलाकारांमध्ये अभिनेता प्रभासचं नाव आवर्जुन घेतलं जातं. बाहुबली- द बिगिनिंग आणि बाहुबली- द कनक्ल्यूजन यांसारख्या चित्रपटांमुळे लोकप्रियतेचे शिखर गाठणााऱ्या या अभिनेत्याचा संपूर्ण भारतात मोठे चाहते आहेत. त्याच्या प्रत्येक सिनेमाची प्रेक्षक मोठ्या आतुरतेने वाट बघत असतात. अखेर सिनेरसिकांची प्रतीक्षा संपली आहे.लवकरच प्रभास स्पिरिट या त्याच्या आगामी चित्रपटातून चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. नुकतंच या चित्रपटाचं पहिलं पोस्टर समोर आलं आहे.नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच आपल्या चित्रपटाचं पोस्टर शेअर करत प्रभास-तृप्ती डिमरीने चाहत्यांना अनोखं सरप्राइज दिलं आहे.
गेल्या वर्षभरापासून संदीप रेड्डी वांगा यांचा स्पिरिट या चित्रपटाची जोरदार चर्चा सुरु होती. अभिनेत्री दीपिका पादुकोणची चित्रपटातून एक्झिट झाल्यानंतर वातावरण चांगलंच तापलं होतं. त्याची अनेक कारणेही समोर आली होती. दीपिकाच्या एक्झिटनंतर सिनेमात प्रभास सोबत तृप्ती डिमरीची जोडी जमली आहे. २०२६ या नवीन वर्षाची धमाकेदार सुरुवात करत, संदीप वांगा यांनी त्यांच्या आगामी 'स्पिरिट' चित्रपटाची पहिली झलक शेअर केली आहे, ज्यामध्ये प्रभास आणि तृप्ती डिमरी यांचा जबरदस्त लूक पाहायला मिळतोय. त्यामुळे चाहत्यांच्या आनंद गगनात मावेनासा झाला आहे.
संदीप रेड्डी वांगा यांच्या आधीच्या ब्लॉकबस्टर 'ॲनिमल' प्रमाणेच 'स्पिरिट' या चित्रपटाचं पहिलं पोस्टर नवीन वर्षाच्या दिवशी म्हणजेच १ जानेवारी २०२६ रोजी मध्यरात्री प्रदर्शित करण्यात आलं आहे. या पोस्टरमुळे चाहते अधिकच उत्सुक झाले आहेत.'स्पिरिट'मध्ये प्रभास लांब केस आणि दाढी-मिशी असलेला त्याचा लूक आहे. या लूकवरून अभिनेत्याच्या पात्राबद्दल अंदाज येतो आहे. शिवाय पोस्टरमध्ये अभिनेत्याच्या एका हातात दारूचा ग्लास आहे, तर दुसरा हात त्याच्या कमरेवर आहे. त्याचा हा लूक सर्वांना आवडला आहे.दुसरीकडे, तृप्ती डिमरीने तिच्या दमदार लूकने चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.यावरून स्पिरिट सिनेमा जबरदस्त एंटरटेन्मेंटचं पॅकेज असणार एवढं मात्र, नक्की...!