समांथा आणि राज अडकले लग्नबंधनात, दिग्दर्शकाची EX पत्नी पोस्ट करत म्हणाली...
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2025 14:18 IST2025-12-01T14:15:50+5:302025-12-01T14:18:35+5:30
राज निदिमोरूची EX पत्नी श्यामली डेच्या एका इन्स्टाग्राम स्टोरी सर्वांचं लक्ष वेधलंय.

समांथा आणि राज अडकले लग्नबंधनात, दिग्दर्शकाची EX पत्नी पोस्ट करत म्हणाली...
अभिनेत्री समांथा रुथ प्रभू सध्या तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळं चर्चेत आहे. ती सिनेदिग्दर्शक राज निदिमोरु यांना डेट करत असल्याच्या चर्चा गेल्या अनेक महिन्यांपासून सुरू आहेत. काही दिवसांपूर्वी समांथाने राजला मिठी मारतानाचा एक फोटो शेअर केला होता. त्यामुळे दोघांनी आपलं नातं अधिकृत केल्याची चर्चा रंगली होती. राज निदिमोरु घटस्फोटीत आहे. समांथानं यापूर्वी अभिनेता नागा चैतन्यसोबत लग्न केलं होते, पण नंतर त्यांचा घटस्फोट झाला. नागा चैतन्यपासून वेगळं झाल्यानंतर समांथाच्या जीवनात अनेक चढउतार आलेत, पण ती सर्व संकटांवर मात करत पुढे गेली. घटस्फोट, नंतर 'मायोसिटिस आजाराचा तिनं मोठ्या हिंमतीन सामना केला. समंथा रुथ प्रभू आणि नागा चैतन्य दोघेही आपापल्या आयुष्यात पुढे गेले आहेत. नागा चैतन्यनं अभिनेत्री शोभिता धुलिपाला (Sobhita Dhulipala) हिच्यासोबत लग्न करत नवा संसार थाटला आहे. आता समांथाही राज निदिमोरुसोबत लग्न बंधनात अडकली आहे. यातच राज निदिमोरूची EX पत्नी श्यामली डेच्या एका इन्स्टाग्राम स्टोरी सर्वांचं लक्ष वेधलंय.
समांथा आणि राज या दोघांनी आज, सोमवार, १ डिसेंबर रोजी अधिकृतपणे विवाह केला आहे. समांथा आणि राजच्या लग्नाच्या चर्चांमध्ये राज निदिमोरूची पत्नी श्यामली डेनं तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर एक पोस्ट शेअर केली आहे. तिची ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होतेय. तिनं लिहिले आहे की, "उतावीळ लोक उतावीळ गोष्टी करतात". विशेष म्हणजे, श्यामलीनं यापूर्वीही राज आणि समांथाच्या नात्याबद्दल अनेकदा अशा पोस्ट्स शेअर केल्या आहेत.

समांथा आणि राज निदिमोरुला यांनी आज (१ डिसेंबर) सकाळीच लिंग भैरवी मंदिरात पारंपरिक पद्धतीने लग्नगाठ बांधली. कुटुंबीय आणि नातेवाईक अशा अगदी मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीत समांथा आणि राज निदिमोरुला यांनी नव्या आयुष्याची सुरुवात केली आहे. समांथा आणि राज यांनी 'द फॅमिली मॅन २' दरम्यान पहिल्यांदा एकत्र काम केलं होतं. त्यानंतर त्यांनी 'सिटाडेल हनी बनी' (Citadel: Honey Bunny) साठीही काम केलं. तसेच, समांथा लवकरच राज आणि डीके यांच्या वेब सीरिज 'रक्त ब्रह्मांड' मध्ये देखील दिसणार आहे.