नागा चैतन्यशी घटस्फोटावर समांथाने ३ वर्षांनी सोडलं मौन, म्हणाली- "माझ्याबद्दल खोट्या गोष्टी सांगितल्या गेल्या..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2024 10:49 IST2024-11-26T10:36:12+5:302024-11-26T10:49:16+5:30

नागा चैतन्यपासून वेगळं झाल्यानंतर जवळपास ३ वर्षांनी अभिनेत्रीने घटस्फोटावर मौन सोडलं आहे. समांथाने घटस्फोटानंतर तिला ट्रोल करण्यात आल्याचा खुलासा केला आहे.

samantha ruth prabhu break silence on divorce with naga chaitanya said i get trolled | नागा चैतन्यशी घटस्फोटावर समांथाने ३ वर्षांनी सोडलं मौन, म्हणाली- "माझ्याबद्दल खोट्या गोष्टी सांगितल्या गेल्या..."

नागा चैतन्यशी घटस्फोटावर समांथाने ३ वर्षांनी सोडलं मौन, म्हणाली- "माझ्याबद्दल खोट्या गोष्टी सांगितल्या गेल्या..."

नागा चैतन्य आणि समांथा रुथ प्रभू ही दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील लोकप्रिय जोडी होती. त्यांच्याकडे आदर्श कपल म्हणून पाहिलं जायचं. पण, २०२१ मध्ये घटस्फोट घेत ते वेगळे झाले. त्यांच्या घटस्फोटाच्या बातमीने चाहत्यांना धक्का बसला होता. नागा चैतन्यशी घटस्फोट घेतल्यानंतर समांथाने पहिल्यांदाच याबाबत भाष्य केलं आहे. नागा चैतन्यपासून वेगळं झाल्यानंतर जवळपास ३ वर्षांनी अभिनेत्रीने घटस्फोटावर मौन सोडलं आहे. 

गलाटा इंडियाला दिलेल्या मुलाखतीत समांथाने घटस्फोटानंतर तिला ट्रोल करण्यात आल्याचा खुलासा केला. नातं तुटलं तर त्यासाठी महिलेला जबाबदार धरलं जातं, असं समांथा म्हणाली. "आपण अशा समाजात राहतो जिथे काही चुकीचं घडल्यास नेहमी महिलांना जबाबदाक धरलं जातं. पुरुषांना कधीच जबाबदार धरलं जात नाही, असं मी म्हणत नाही. पण, महिलांना केवळ ऑनलाईनच नव्हे तर खऱ्या आयुष्यातही याचा सामना करावा लागतो.", असं समांथा म्हणाली. 

घटस्फोटानंतर झालेल्या ट्रोलिंगबाबतही समांथाने भाष्य केलं. ती म्हणाली, "माझ्याबद्दल अनेक गोष्टी बोलल्या गेल्या ज्या खऱ्या नव्हत्या. पण, मी स्वत:ला सांभाळलं. जेव्हा खोटं पसरवलं जात होतं तेव्हा मी स्वत:शी संवाद साधायचे. कधी कधी मला वाटायचं की खरं आहे ते समोर आणलं पाहिजे. हे खोटं आहे, असं सांगितलं पाहिजे. पण, मी नेहमी स्वत:ला थांबवलं. खोट्या गोष्टींबाबत बोलून काय होणार आहे, असं मला वाटलं. काही लोक तुमच्यावर प्रेम करतात. पण, काही दिवसांनी तुमच्याकडून झालेल्या छोट्या चुकांनी ते नाराज होतात. माझ्या कुटुंबीयांना आणि मित्रपरिवाराला खरं काय ते माहीत आहे, हे पुरेसं नाही का? जर बाकीचे लोक चुकीचं समजत असतील, तर मला काही प्रॉब्लेम नाही". 

"लोकांनी माझ्यावर प्रेम करावं आणि माझं कौतुक करावं, असंच मला वाटायचं. मी असाच विचार करते आणि यात काहीही चुकीचं नाही. पण, मी कोणावरही माझे विचार लादू शकत नाही. ज्याला जसा विचार करायचा आहे, तसाच विचार त्याने करावा", असंही समांथा म्हणाली. समांथा आणि नागा चैतन्यने २०१७ मध्ये लग्न केलं होतं. पण, लग्नानंतर अवघ्या ४ वर्षांतच घटस्फोट घेत ते वेगळे झाले. समांथाशी घटस्फोट घेतल्यानंतर नागा चैतन्य आता शोभिता धुलिपालासोबत संसार थाटणार आहे. 

Web Title: samantha ruth prabhu break silence on divorce with naga chaitanya said i get trolled