श्रीलीला, नितीन आणि डेव्हिड वॉर्नरचा चित्रपट घरबसल्या पाहा, 'या' ओटीटी प्लॅटफॉर्मवर येतोय!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2025 19:07 IST2025-05-06T19:07:17+5:302025-05-06T19:07:47+5:30

थिएटरनंतर आता 'रॉबिनहूड' हा चित्रपट अखेर ओटीटी रिलीजसाठी सज्ज झाला आहे.

Robinhood Movie Ott Release Nithiin Sreeleela David Warner Devdutt Nage Zee5 2025 | श्रीलीला, नितीन आणि डेव्हिड वॉर्नरचा चित्रपट घरबसल्या पाहा, 'या' ओटीटी प्लॅटफॉर्मवर येतोय!

श्रीलीला, नितीन आणि डेव्हिड वॉर्नरचा चित्रपट घरबसल्या पाहा, 'या' ओटीटी प्लॅटफॉर्मवर येतोय!

ओटीटी(OTT) प्लॅटफॉर्म्सवर नियमितपणे दर आठवड्याला वेब सीरिज, चित्रपट प्रदर्शित होत असतात. त्यामुळे अनेक जण चित्रपटगृहांमध्ये जाण्याऐवजी घरात बसूनच ओटीटी प्लॅटफॉर्मवर चित्रपट किंवा वेब सीरिज पाहणे पसंत करतात. आता आम्ही तुम्हाला अशा एका चित्रपटाबद्दल माहिती देणार आहोत, जो लवकरच ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे. विशेष म्हणजे या चित्रपटात दाक्षिणात्य अभिनेत्री श्रीलीला आणि अभिनेता नितीन आणि ऑस्ट्रेलियाचा क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरदेखील आहे. ज्यांना सिनेमा थिएटरमध्ये पाहता आला नाही त्यांना आता घरीच तो पाहायची संधी मिळत आहे.

श्रीलीला आणि नितीन यांचा बहुचर्चित 'रॉबिनहूड' सिनेमा थिएटरनंतर OTT प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होतोय. या अ‍ॅक्शन-कॉमेडी चित्रपटात ऑस्ट्रेलियाचा क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरचा खास कॅमिओ आहे. 'रॉबिनहूड' हा चित्रपट २८ मार्च २०२५ रोजी थिएटरमध्ये रिलीज झाला होता. आता हा चित्रपट १० मे २०२५ पासून ZEE5 वर स्ट्रीमिंगसाठी उपलब्ध होईल. 

या सिनेमाची खास गोष्ट म्हणजे यामध्ये  लोकप्रिय मराठी अभिनेता देवदत्त नागे झळकला आहे. 'रॉबिनहूड' या चित्रपटात देवदत्तनं 'सामी' या व्यक्तीमत्वाची भूमिका साकारली. दरम्यान, 'रॉबिनहूड'नं बॉक्स ऑफिसवर अपेक्षित कामगिरी केलेली नाही. त्यामुळं आता हा सिनेमा OTTवर तरी आपली छाप पाडू शकेल का? असा प्रश्न आहे. 

Web Title: Robinhood Movie Ott Release Nithiin Sreeleela David Warner Devdutt Nage Zee5 2025

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.