हात जोडले, खाली वाकले अन्...; रश्मिका-विजयच्या 'त्या' कृतीने जिंकली मनं, वेडिंग रिसेप्शनचा व्हिडीओ व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2026 10:28 IST2026-03-05T10:27:47+5:302026-03-05T10:28:11+5:30
हैदराबादमध्ये रश्मिका-विजयचं वेडिंग रिसेप्शन पार पडलं. या वेडिंग रिसेप्शनमध्ये रश्मिका-विजयच्या एका कृतीने सगळ्यांची मनं जिंकून घेतली.

हात जोडले, खाली वाकले अन्...; रश्मिका-विजयच्या 'त्या' कृतीने जिंकली मनं, वेडिंग रिसेप्शनचा व्हिडीओ व्हायरल
Rashmika Mandanna-Vijay Deverakonda Wedding Reception: साऊथचं ब्युटिफूल कपल रश्मिका मंदाना आणि विजय देवराकोंडा नुकतेच विवाहबंधनात अडकले आहेत. रश्मिका-विजयने २६ फेब्रवारीला उदयपूरमध्ये मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीत लग्नगाठ बांधली. त्यांच्या शाही विवाहसोहळ्याचे फोटो व्हायरल झाले होते. त्यानंतर बुधवारी(४ मार्च) हैदराबादमध्ये रश्मिका-विजयचं वेडिंग रिसेप्शन पार पडलं. या वेडिंग रिसेप्शनमध्ये रश्मिका-विजयच्या एका कृतीने सगळ्यांची मनं जिंकून घेतली.
रश्मिका आणि विजयने वेडिंग रिसेप्शनला पारंपरिक पेहरावाला पसंती दिली. लाल रंगाच्या साडीत नवविवाहित रश्मिका नटली होती. तर विजय देवराकोंडाने लुंगी परिधान केली होती. एकमेकांचा हात पकडून रश्मिका-विजयने वेडिंग रिसेप्शन सोहळ्यात एन्ट्री घेतली. त्यानंतर त्यांनी वाकून अन् हात जोडून पापाराझींना नमस्कार केला. त्यानंतर त्यांनी फोटोसाठी पोझही दिल्या. त्यांच्या या कृतीने सगळेच भारावून गेले. रश्मिका-विजयच्या वेडिंग रिसेप्शनमधील हा व्हिडीओ व्हायरल झाला असून चाहत्यांकडून त्यावर कौतुकाचा वर्षाव होतो आहे.
रश्मिका आणि विजयच्या वेडिंग रिसेप्शनला साऊथ सिनेसृष्टीतील कलाकारांनी हजेरी लावली होती. राम चरण आणि त्याची पत्नी उपासना, नागा चैतन्या, चिरंजीवी, नागार्जुन, रवि तेजा, व्यंकटेश, अल्लू अर्जुन, महेश बाबू यांनी हजेरी लावली होती. तर बॉलिवूड सेलिब्रिटीही या रिसेप्शनला उपस्थित होते. नीना गुप्ता, कृती सेनन, रिय चक्रवर्ती यांनीही रिसेप्शनला हजेरी लावली होती.