Pushpa 2च्या रिलीज आधी रश्मिका मंदानाचा तिसऱ्या सीक्वलबाबत खुलासा, म्हणते - "या कथेला..."

By ऑनलाइन लोकमत | Published: January 19, 2024 03:22 PM2024-01-19T15:22:30+5:302024-01-19T15:23:24+5:30

Pushpa 2 : 'पुष्पा २'चे चाहते उत्सुकतेनं वाट पाहत आहेत. चित्रपट प्रदर्शित होण्याआधी अभिनेत्री रश्मिका मंदाना हिने एक मोठा खुलासा केला आहे.

Rashmika Mandanna reveals third sequel ahead of Pushpa 2 release, says - "This story... | Pushpa 2च्या रिलीज आधी रश्मिका मंदानाचा तिसऱ्या सीक्वलबाबत खुलासा, म्हणते - "या कथेला..."

Pushpa 2च्या रिलीज आधी रश्मिका मंदानाचा तिसऱ्या सीक्वलबाबत खुलासा, म्हणते - "या कथेला..."

'पुष्पा: द राइज' (Pushpa:The Rise) चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर भरघोस प्रतिसाद मिळाल्यानंतर आता चाहते 'पुष्पा २: द रूल' (Pushpa 2 : The Rule) ची उत्सुकतेने वाट पाहत आहेत. अल्लू अर्जुन (Allu Arjun) आणि रश्मिका मंदाना (Rashmika Mandanna) अभिनीत या चित्रपटासंदर्भात सतत नवीन अपडेट समोर येत आहेत. दरम्यान आता या चित्रपटातील श्रीवल्ली म्हणजेच अभिनेत्री रश्मिका मंदाना हिने पुष्पा २ संदर्भात मोठी अपडेट दिली आहे. हे वाचून चाहत्यांचा आनंद द्विगुणित होईल.

पिंकविलासोबतच्या संवादादरम्यान रश्मिका मंदानाने चित्रपटाविषयी बरीच माहिती शेअर केली. ती म्हणाली की, 'आम्हाला माहीत आहे की चित्रपटाच्या दुसऱ्या भागाकडून लोकांना खूप अपेक्षा आहेत. आम्ही चाहत्यांच्या अपेक्षा पूर्ण करण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करत आहोत आणि मी तुम्हाला वचन देते की हा चित्रपट पहिल्या भागापेक्षाही मोठा असणार आहे. 

चित्रपट कसा असेल?
रश्मिका पुढे म्हणाली की, चित्रपटात तुम्हाला खूप वेडेपणा पाहायला मिळेल. या चित्रपटासाठी मी नुकतेच एक गाणे शूट केले आहे. हे गाणे केल्यानंतर मी चकीत झाले आहे. मी निर्मात्यांना पण म्हणाले की, भाऊ तुम्ही काय विचार करत आहात? पुष्पा २ चांगला चित्रपट बनवण्यासाठी प्रत्येकजण मेहनत घेत आहे. त्याच वेळी, आम्ही सर्वजण या प्रक्रियेचा खूप आनंद घेत आहोत.

पुढच्या भागाबाबत दिली मोठी हिंट
अभिनेत्री म्हणाली, 'ही एक अशी कथा आहे ज्याला अंत नाही. हे खूप मजेदार आहे. त्याच वेळी, अभिनेत्रीने तिच्या मुलाखतीत पुष्पा ३ ची हिंट दिली. तिच्या बोलण्यावरून असा अंदाज लावला जाऊ शकतो की पुष्पा २ रिलीज झाल्यानंतर निर्माते त्याच्या तिसऱ्या भागाची देखील करू शकतात.

या दिवशी 'पुष्पा २' चित्रपट होणार प्रदर्शित
पुष्पा २-द रुल हा चित्रपट पुढच्या वर्षी १५ ऑगस्टला थिएटरमध्ये दाखल होणार आहे. या चित्रपटाची प्रेक्षकांमध्ये प्रचंड क्रेझ होती. चाहते चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. पुष्पा या चित्रपटाचा पहिला भाग बॉक्स ऑफिसवर ब्लॉकबस्टर ठरला होता. अल्लू अर्जुन व्यतिरिक्त फहद फासिल, रश्मिका मंदाना, सुनील, प्रकाश राज, जगपती बाबू, अनुसया भारद्वाज या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत दिसले होते.

Web Title: Rashmika Mandanna reveals third sequel ahead of Pushpa 2 release, says - "This story...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.