रश्मिकाने शेअर केलेल्या व्हिडीओत दिसली साखरपुड्याची अंगठी, विजय देवराकोंडासोबत लवकरच करणार लग्न
By कोमल खांबे | Updated: October 11, 2025 13:37 IST2025-10-11T13:36:53+5:302025-10-11T13:37:24+5:30
साऊथ स्टार विजय देवराकोंडा आणि अभिनेत्री रश्मिका मंदाना यांनी काही दिवसांपूर्वीच गुपचूप साखरपुडा केला. मात्र, अद्याप दोघांकडूनही याची अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.

रश्मिकाने शेअर केलेल्या व्हिडीओत दिसली साखरपुड्याची अंगठी, विजय देवराकोंडासोबत लवकरच करणार लग्न
साऊथ स्टार विजय देवराकोंडा आणि अभिनेत्री रश्मिका मंदाना यांनी काही दिवसांपूर्वीच गुपचूप साखरपुडा केला. कुटुंब आणि मित्रपरिवाराच्या उपस्थितीत रश्मिका आणि विजयने साखरपुडा केला. मात्र, अद्याप दोघांकडूनही याची अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. साखरपुडा झाल्यानंतर रश्मिका आणि विजयच्या लग्नाच्या चर्चाही सुरू झाल्या आहेत. याच दरम्यान अभिनेत्रीने तिची साखरपुड्याची अंगठी फ्लॉन्ट केली आहे.
रश्मिकाने तिच्या इन्स्टाग्रामवरुन एक व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये रश्मिकाच्या डाव्या हातात साखरपुड्याची अंगठी दिसत आहे. या व्हिडीओत रश्मिका तिच्या घरातील कुत्र्यासोबत खेळताना दिसत आहे. रश्मिकाच्या बोटातील अंगठी चाहत्यांनी स्पॉट केली आहे. रश्मिकाची अंगठी पाहून चाहत्यांनी विजय देवराकोंडासोबतचं रिलेशन कन्फर्म असल्याचं म्हटलं आहे.
साखरपुड्यानंतर आता रश्मिका आणि विजय लग्नाच्या बेडीत अडकणार असल्याचं म्हटलं जात आहे. विजय-रश्मिकाच्या जवळच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्या घरी लग्नाची तयारी सुरू असून येत्या फेब्रुवारी महिन्यात ते लग्न करणार आहेत.