समांथासोबत लग्न करताच राज निदिमोरुने अभिनेत्रीला दिली 'ही' खास भेट, तुम्हीही कराल कौतुक
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2025 11:21 IST2025-12-03T11:17:59+5:302025-12-03T11:21:42+5:30
समांथासोबत लग्न केल्यानंतर राजने तिला एक महागडी आणि विशेष भेटवस्तू दिली आहे. याबद्दल वाचून तुम्हीही म्हणाल नवरा असावा तर असा

समांथासोबत लग्न करताच राज निदिमोरुने अभिनेत्रीला दिली 'ही' खास भेट, तुम्हीही कराल कौतुक
अभिनेत्री समांथा रुथ प्रभू आणि दिग्दर्शक-निर्माता राज निदिमोरु हे दोघे नुकतेच लग्नबंधनात अडकले. १ डिसेंबर २०२५ रोजी एका खासगी समारंभात विवाहबंधनात अडकून या जोडीने चाहत्यांना आश्चर्याचा सुखद धक्का दिला. कोईम्बतूरच्या ईशा योग सेंटरमधील लिंग भैरवी मंदिरात अगदी जवळचे मित्र आणि कुटुंबीयांच्या उपस्थितीत त्यांचा विवाहसोहळा पार पडला.
या सीक्रेट विवाहानंतर समांथाच्या वेडिंग रिंगबद्दलही चांगलीच चर्चा झाली. समांथाने बोटात तब्बल दीड कोटी रुपयांची अनोखी वेडिंग रिंग परिधान केली होती. इतकंच नव्हे लग्न होताच राज निदिमोरुने तिला एक अत्यंत खास भेट दिल्याची माहिती समोर येत आहे.
राजने समांथाला दिली 'आलिशान' भेट
रिपोर्ट्सनुसार, राज निदिमोरुने पत्नी समांथा हिला लग्नानंतर हैदराबादमधील जुबली हिल्स परिसरातील एक आलिशान घर भेट दिले आहे. एशियानेट न्यूजच्या माहितीनुसार, राजने समांथाला वेडिंग गिफ्ट म्हणून या घराची चावी दिली आहे. समांथासाठी ही भेट म्हणजे तिच्या वैवाहिक जीवनाची एक सुंदर सुरुवात आहे.
नणंदेची भावनिक पोस्ट
समांथा आणि राजच्या लग्नामुळे दोन्ही कुटुंबांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. राजची बहीण शीतल निदिमोरुने आपल्या वहिनीसाठी म्हणजेच समांथासाठी एक भावनिक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे. शीतलने एक सुंदर कविता पोस्ट करत लिहिलंय की, "प्रत्येकाला असे प्रेम मिळो, जे इतके शांत, इतके स्थिर आणि इतके खरे वाटेल." शीतलच्या या प्रेमळ पोस्टबद्दल समांथाने तिचे आभार मानले आहेत.
यापूर्वी समांथाचा विवाह अभिनेता नागा चैतन्यशी २०१७ मध्ये झाला होता, पण २०२१ मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. त्याचप्रमाणे, राजचा देखील श्यामली डेसोबत पहिलं लग्न ढालं होतं. पण २०२२ मध्ये ते एकमेकांपासून वेगळे झाले. आता समांथा आणि राज यांनी त्यांचे नवीन जीवन एकत्र सुरू केले आहे. चाहत्यांनी दोघांचंही अभिनंदन करुन त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.