'पुष्पा 2'नंतर 'पुष्पा 3' येणार की नाही? अल्लू अर्जुनच्या पोस्टमधून चाहत्यांना मिळालं उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2024 14:05 IST2024-11-27T14:04:49+5:302024-11-27T14:05:16+5:30

'पुष्पा 2' रिलीज होत असतानाच 'पुष्पा 3' बद्दलही मोठी अपडेट समोर आलीय

Pushpa 2 will be followed by Pushpa 3 starring allu arjun rashmika mandanna | 'पुष्पा 2'नंतर 'पुष्पा 3' येणार की नाही? अल्लू अर्जुनच्या पोस्टमधून चाहत्यांना मिळालं उत्तर

'पुष्पा 2'नंतर 'पुष्पा 3' येणार की नाही? अल्लू अर्जुनच्या पोस्टमधून चाहत्यांना मिळालं उत्तर

'पुष्पा 2'ची सध्या चाहत्यांना उत्सुकता आहे. अल्लू अर्जुन-रश्मिका मंदानाचा हा बहुचर्चित सिनेमा अवघ्या काही दिवसांमध्ये रिलीज होणार आहे. 'पुष्पा 2' हा २०२४ चा बिग बजेट आणि बहुचर्चित सिनेमा म्हणून चर्चेत आहे. अल्लू अर्जुन आणि रश्मिकाची सिनेमात प्रमुख भूमिका आहे. 'पुष्पा 2'च्या रिलीजची चर्चा असतानाच 'पुष्पा 3'बद्दल प्रेक्षकांना मोठी बातमी मिळालीय. स्वतः रश्मिका मंदानाने पोस्ट केल्यामुळे 'पुष्पा'च्या चाहत्यांना तिसऱ्या भागाबद्दल मोठी माहिती मिळालीय.

'पुष्पा 2'नंतर येणार 'पुष्पा 3'?

'पुष्पा 2'चे प्रमुख कलाकार अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदाना यांनी खास पोस्ट करुन याविषयी माहिती दिलीय. सुरुवातीला अल्लू अर्जुनने सेटवरील फोटो पोस्ट केलाय. या सेटवर शूटिंगची ट्रॉली आणि कलाकारांची गर्दी दिसत आहे. या पोस्टखाली अल्लूने कॅप्शन लिहिलंय की, "शेवटचा दिवस अन् पुष्पाचा शेवटचा दिवस. पुष्पाचा ५ वर्षांचा प्रवास पूर्ण झालाय. किती भारी प्रवास होता?" अशी अल्लूने पोस्ट केलीय. 


'पुष्पा 3' येणार की नाही?

अल्लू अर्जुनच्या या पोस्टवरुन हे स्पष्ट झालंय की पुष्पा 2 नंतर सिनेमाचा कोणताही भाग येणार नाही. अल्लू अर्जुनने दोन्ही सिनेमांच्या पाच वर्षांच्या प्रवासाचा उल्लेख केल्याने पुष्पाचा तिसरा भाग येणार नाही, यावर शिक्कामोर्तब झालंय असं म्हणायला हरकत नाही. दरम्यान बिग बजेट अन् बहुचर्चित 'पुष्पा 2' ५ डिसेंबरला रिलीज होणार आहे. या सिनेमात अल्लू अर्जुन, फहाद फासिल, रश्मिका मंदाना या कलाकारांची प्रमुख भूमिका आहे.

Web Title: Pushpa 2 will be followed by Pushpa 3 starring allu arjun rashmika mandanna