अल्लू अर्जुनच्या 'पुष्पा २'चा ट्रेलर कधी पाहायला मिळणार? तारीख अन् वेळही आली समोर

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2024 11:51 IST2024-11-11T11:50:26+5:302024-11-11T11:51:10+5:30

'पुष्पा २'ची सध्या सर्वांना उत्सुकता असून सिनेमाच्या ट्रेलरबद्दल मोठी अपडेट समोर आलीय

pushpa 2 trailer updates starring allu arjun rashmika mandanna fahad fasil | अल्लू अर्जुनच्या 'पुष्पा २'चा ट्रेलर कधी पाहायला मिळणार? तारीख अन् वेळही आली समोर

अल्लू अर्जुनच्या 'पुष्पा २'चा ट्रेलर कधी पाहायला मिळणार? तारीख अन् वेळही आली समोर

'पुष्पा २'बद्दल उत्सुकता सध्या शिगेला आहे. 'पुष्पा २'मध्ये पुन्हा एकदा अल्लू अर्जुन, रश्मिका मंदाना यांची अदाकारी बघायला मिळणार आहे. २०२१ साली आलेल्या 'पुष्पा'च्या पहिल्या भागाला प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळाला. पहिल्या भागाच्या शेवटी दुसऱ्या भागाबद्दल प्रेक्षकांना सांगितलं  गेलं. त्यामुळे दुसरा भाग 'पुष्पा-द रुल'ची सर्वांना उत्सुकता होती. अखेर दुसऱ्या भागाचा रिलीजचा मार्ग मोकळा झाला असून बहुप्रतिक्षित 'पुष्पा २'चा ट्रेलर कधी येणार, याची सर्वांना उत्सुकता होती. अखेर याबद्दल मोठी अपडेट समोर आलीय. 

कधी पाहायला मिळणार 'पुष्पा २'चा ट्रेलर?

नुकतीच 'पुष्पा २'च्या ट्रेलरची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. याशिवाय अल्लू अर्जुनच्या ऑफिशियल सोशल मीडिया अकाऊंटवर 'पुष्पा २' संबंधी नवीन पोस्टर रिलीज करण्यात आलं आहे. टीझर आणि गाण्यानंतर 'पुष्पा २'च्या ट्रेलरची सर्वांना उत्सुकता आहे. १७ नोव्हेंबरला 'पुष्पा २'चा ट्रेलर लॉंच होणार आहे. पटणा येथे या ट्रेलर लॉंचचा भव्य कार्यक्रम होणार आहे. अल्लू अर्जुन, रश्मिका मंदानाच्या बहुचर्चित 'पुष्पा २'चा ट्रेलर १७ नोव्हेंबरला संध्याकाळी ६ वाजून ३ मिनिटांनी रिलीज करण्यात येणार आहे.

'पुष्पा २'ची रिलीज डेट काय?

'पुष्पा २'ची रिलीज डेट काहीच दिवसांपूर्वी लॉक झालीय. ५ डिसेंबरला 'पुष्पा २' रिलीज होतोय. आधी हा सिनेमा या वर्षी स्वातंत्र्यदिनाला रिलीज होणार होता. परंतु अनेकदा सिनेमाची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली. अखेर 'पुष्पा २'ची रिलीज डेट ५ डिसेंबरला जाहीर करण्यात आलीय. त्यामुळे २०२४ च्या अखेरीस 'पुष्पा २' बॉक्स ऑफिसवर धमाका करणार, अशी शक्यता नाकारता येत नाही. आता सर्वांना 'पुष्पा २'च्या ट्रेलरची उत्सुकता आहे.

 

Web Title: pushpa 2 trailer updates starring allu arjun rashmika mandanna fahad fasil