"तुमचे अनेक चाहते असतील पण मी.."; लेकाने लिहिलेलं पत्र वाचून 'पुष्पा 2' फेम अल्लू अर्जुन भावुक
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2024 11:26 IST2024-12-05T11:25:25+5:302024-12-05T11:26:16+5:30
अल्लू अर्जुनच्या लेकाने बाबासाठी पुष्पा 2 च्या रिलीजआधी खास पत्र लिहिलंय. ते वाचून अभिनेता चांगलाच भावुक झालेला दिसतोय

"तुमचे अनेक चाहते असतील पण मी.."; लेकाने लिहिलेलं पत्र वाचून 'पुष्पा 2' फेम अल्लू अर्जुन भावुक
आज 'पुष्पा 2' जगभरात रिलीज झालाय. गेल्या अनेक महिन्यांपासून 'पुष्पा 2'ची चांगलीच क्रेझ होती. अखेर आज 'पुष्पा 2' रिलीज झालाय. अल्लू अर्जुनच्या चाहत्यांना या सिनेमाची खास पर्वणी मिळणार यात शंका नाही. अशातच 'पुष्पा 2' रिलीज होताच अल्लू अर्जुनच्या आयुष्यात भावुक करणारी गोष्ट घडलीय. अभिनेत्याच्या १० वर्षांच्या लेकाने बाबाला शुभेच्छा देण्यासाठी स्वतःच्या हाताने कागदावर पत्र लिहिलंय. हे पत्र वाचून अभिनेता भावुक झालेला दिसला.
अल्लू अर्जुनच्या लेकाचं खास पत्र
अल्लू अर्जुनचा लेक म्हणाला, "प्रिय बाबा, मी हे लिहित आहे तुम्हाला हे सांगायला की मला तुमचा खूप अभिमान वाटतोय. तुमचं यश, मेहनत आणि पॅशन यांचं मला कौतुक आहे. तुम्ही जेव्हा नंबर १ वर असता तेव्हा मी जगाच्या शिखरावर आहे असं मला वाटतं. आज ग्रेट अभिनेत्याचा सिनेमा येत असल्याने खूप खास दिवस आहे. सध्या तुमच्यामध्ये मिक्स इमोशन्स आहेत हे मी समजू शकतो. पण मी तुम्हाला सांगू इच्छितो की, पुष्पा 2 हा सिनेमा नाही तर अभिनयाविषयी तुमचं जे प्रेम अन् पॅशन आहे त्याचं हे रिफ्लेक्शन आहे. मी तुम्हाला आणि तुमच्या प्रेमाला बेस्ट ऑफ लक सांगू इच्छितो."
या चिठ्ठीत पुढे लिहिलंय की, "निकाल काहीही येईल तुम्ही माझे हिरो अन् आदर्श कायम असाल. तुमचे अनेक फॅन असतील पण मी सुद्धा तुमचा नंबर १ फॅन असेल. एका प्राउड मुलाकडून त्याच्या टॉप आयडॉलला लिहिलेलं पत्र." अल्लू अर्जुनने लेकाने लिहिलेलं हे पत्र शेअर करताच अभिनेत्याने लिहिलंय की, "माझा मुलगा अयानच्या प्रेमाने माझ्या हृदयाला स्पर्श केलाय. माझ्यासाठी आजवरची सर्वात मोठी गोष्ट आहे. मी नशीबवान आहे की मला असं प्रेम मिळालं."अभिनेता अल्लू अर्जुनचा बहुचर्चित 'पुष्पा 2' आज जगभरात रिलीज झालाय.