'ऊ अंंटावा..' नाही नवीन धमाकेदार गाणं घेऊन येतोय 'पुष्पा', समांथाच्या जागी दिसणार 'ही' अभिनेत्री

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2024 11:45 IST2024-11-11T11:44:47+5:302024-11-11T11:45:47+5:30

Pushpa Movie : पुष्पा: द राइजने 'ऊ अंंटावा..' हे सुपरहिट गाणे दिले, जे जगभरात लोकप्रिय झाले. आता अल्लू अर्जुन दक्षिण भारतातील डान्सिंग क्वीनसोबत डान्स करण्यासाठी सज्ज झाला आहे.

No 'Oo Antava..' 'Pushpa' comes with a new banging song, actress 'Hee' will appear in place of Samantha | 'ऊ अंंटावा..' नाही नवीन धमाकेदार गाणं घेऊन येतोय 'पुष्पा', समांथाच्या जागी दिसणार 'ही' अभिनेत्री

'ऊ अंंटावा..' नाही नवीन धमाकेदार गाणं घेऊन येतोय 'पुष्पा', समांथाच्या जागी दिसणार 'ही' अभिनेत्री

साऊथ सिनेइंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेत्री श्रीलीला (Shrileela) आता 'पुष्पा २: द रुल' (Pushpa 2: The Rule) या चित्रपटातील एका खास गाण्याच्या माध्यमातून प्रेक्षकांची मने जिंकणार आहे. या चित्रपटाच्या सीक्वलमध्ये अल्लू अर्जुन (Allu Arjun) पुन्हा एकदा पुष्पाराजच्या भूमिकेत कमबॅक करणार आहे, तर रश्मिका मंदाना (Rashmika Mandanna) श्रीवल्लीच्या भूमिकेत दिसणार आहे. श्रीलीलाचं गाणं चित्रपटाची उत्सुकता आणखी वाढवणार आहे. निर्मात्यांनी एका अप्रतिम पोस्टरद्वारे खुलासा केला आहे की श्रीलीला एका खास गाण्याच्या माध्यमातून पुष्पा २: द रुलचा भाग असेल.

पुष्पा: द राइजने 'ऊ अंंटावा..' हे सुपरहिट गाणे दिले, जे जगभरात लोकप्रिय झाले. आता अल्लू अर्जुन दक्षिण भारतातील डान्सिंग क्वीन श्रीलीलासोबत डान्स करण्यासाठी सज्ज झाला आहे. या वर्षातील सर्वात मोठ्या चित्रपटातील एका खास गाण्यासाठी ती चांगलीच पसंती आहे. या खास गाण्याच्या ट्रेलरची घोषणा लवकरच होणार आहे. हे गाणे गणेश आचार्य यांनी कोरिओग्राफ केले आहे.

अलिकडच्या चित्रपटांमध्ये तिच्या दमदार अभिनयासाठी ओळखली जाणारी, श्रीलीला पुष्पा २: द रुल मधील एका धमाकेदार गाण्यात दिसणार आहे. हे गाणे चित्रपटाचे मुख्य आकर्षण ठरणार असून यात श्रीलीला ग्लॅमरस लूकमध्ये दिसणार आहे.

'पुष्पा २'मध्ये दिसणार हे कलाकार

पुष्पा २: द रुलमध्ये अल्लू अर्जुन, रश्मिका मंदान्ना आणि फहाद फासिल मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. पुष्पा हे देशातील मोठे नाव बनले असून यशाचा नवीन ट्रेंड प्रस्थापित केला आहे. पुष्पा २: द रुल ५ डिसेंबर २०२४ रोजी जगभरातील थिएटरमध्ये रिलीज होणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन सुकुमार यांनी केले आहे आणि मिथ्री मूव्ही मेकर्स निर्मित आहे. संगीत टी सीरीजचे आहे.

Web Title: No 'Oo Antava..' 'Pushpa' comes with a new banging song, actress 'Hee' will appear in place of Samantha