थिएटरमध्ये 'मेगा फ्लॉप' पण OTT वर ठरला 'मास्टरपीस', 'या' चित्रपटाची सगळीकडे होतेय चर्चा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2026 18:10 IST2026-01-20T18:10:16+5:302026-01-20T18:10:48+5:30

थिएटरमध्ये फ्लॉप ठरलेले काही चित्रपट ओटीटीवर ट्रेंडिंग असतात.

Nithin Sreeleela Robinhood Movie Ott Success After Box Office Flop Hidden Gems | थिएटरमध्ये 'मेगा फ्लॉप' पण OTT वर ठरला 'मास्टरपीस', 'या' चित्रपटाची सगळीकडे होतेय चर्चा!

थिएटरमध्ये 'मेगा फ्लॉप' पण OTT वर ठरला 'मास्टरपीस', 'या' चित्रपटाची सगळीकडे होतेय चर्चा!

ओटीटीवर दर आठवड्याला नवीन चित्रपट रिलीज होतात. थिएटरमध्ये फ्लॉप ठरलेले काही चित्रपट ओटीटीवर ट्रेंडिंग असतात. दाक्षिणात्य कलाकारांचा असाच एक चित्रपट ओटीटीवर गाजतोय. दाक्षिणात्य सुपरस्टार नितीन आणि ग्लॅमरस अभिनेत्री श्रीलीला यांचा 'रॉबिनहूड' हा चित्रपट सध्या चर्चेत आला आहे. 

२०२५ च्या सुरुवातीला जेव्हा 'रॉबिनहूड' चित्रपटगृहात प्रदर्शित झाला, तेव्हा या चित्रपटाकडे प्रेक्षकांनी पाठ फिरवली. मात्र, ओटीटीवर येताच केवळ २४ तासांत या चित्रपटाने भारतासह अनेक देशांमध्ये टॉप ट्रेंडिंगमध्ये स्थान मिळवलं आहे. विशेष म्हणजे या सिनेमात माजी ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरचा एक कॅमिओ आहे.

नितिन आणि श्रीलीला यांचा 'रॉबिनहूड' चित्रपट वेंकी कुदुमुला यांनी दिग्दर्शित केला आहे. या चित्रपटाची कथाही त्यांनी लिहिली आहे. नितीन आणि श्रीलीला व्यतिरिक्त देवदत्त नागे, राजेंद्र प्रसाद आणि शाइन टॉम चाको देखील चित्रपटाचा भाग आहेत. निर्मात्यांनी ५५ ते ७० कोटी रुपयांच्या बजेटमध्ये हा चित्रपट तयार केला आहे.  तुम्ही हा चित्रपट जिओ हॉटस्टार, प्राईम व्हिडीओ आणि झी५ वर घरबसल्या पाहू शकता. 
 

Web Title : थिएटर में फ्लॉप, ओटीटी पर हिट: 'रॉबिनहुड' फिल्म पर हो रही है चर्चा!

Web Summary : नितिन और श्रीलीला की 'रॉबिनहुड' थिएटर में फ्लॉप हो गई, लेकिन ओटीटी पर हिट हो गई, कई देशों में ट्रेंड कर रही है। वेंकी कुदुमुला द्वारा निर्देशित इस फिल्म में डेविड वार्नर का कैमियो भी है। अब जियो हॉटस्टार, प्राइम वीडियो और ज़ी5 पर उपलब्ध है।

Web Title : Theater Flop, OTT Hit: 'Robinhood' Film Sparks Discussion!

Web Summary : Nithin and Sreeleela's 'Robinhood' flopped in theaters but became a hit on OTT, trending in many countries. The film, directed by Venky Kudumula, also features a cameo by David Warner. Now available on Jio Hotstar, Prime Video, and Zee5.

टॅग्स :cinemaसिनेमा