जबरदस्त क्राइम थ्रिलर, OTT वर ट्रेंडिंग आहे ७.३ रेटिंग असलेला 'हा' चित्रपट
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2025 15:53 IST2025-10-07T15:46:08+5:302025-10-07T15:53:26+5:30
ए.आर. मुरुगदास दिग्दर्शित या अॅक्शन थ्रिलरला आयएमडीबीकडून ७.३ असे प्रभावी रेटिंग मिळाले आहे.

जबरदस्त क्राइम थ्रिलर, OTT वर ट्रेंडिंग आहे ७.३ रेटिंग असलेला 'हा' चित्रपट
चित्रपटगृहांमध्ये जाऊन चित्रपट पाहण्याचा आनंद वेगळा असला तरी, ओटीटी प्लॅटफॉर्मने प्रेक्षकांना घरबसल्या धमाकेदार चित्रपट आणि वेब सिरीज पाहण्याची अभूतपूर्व संधी दिली आहे. आपल्या सोयीनुसार आणि वेळेनुसार मनोरंजन (binge-watching) करणे ही आजच्या प्रेक्षकांची आवड बनली आहे. यामुळेच, नवीन धमाकेदार चित्रपट किंवा सीरिज ओटीटीवर कधी प्रदर्शित होणार, यासाठी चाहते नेहमीच उत्सुक असतात. अलीकडेच, एक शानदार तमिळ क्राइम थ्रिलर चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला, जो गेल्या चार दिवसांपासून ओटीटी ट्रेंडिंग मूव्हीजमध्ये पहिल्या क्रमांकावर आहे. हा चित्रपट मोठ्या प्रमाणात पाहिला जात आहे.
गेल्या ३ ऑक्टोबर रोजी ओटीटीवर एक चित्रपट प्रदर्शित झाला आणि लगेच प्रेक्षकांची पसंत बनलाय. २ तास २६ मिनिटांच्या या चित्रपटाची कथा थक्क करणारी आहे. चित्रपटात दोन खलनायक दाखवले गेले आहेत, जे तमिळनाडूमध्ये शस्त्रांचा पुरवठा करतात आणि त्यांनी गुन्हेगारीचे राज्य निर्माण केलंय. या दोन्ही गँगस्टर्सना पकडण्यात प्रशासन पूर्णपणे अपयशी ठरतं. त्यानंतर चित्रपटात हिरोची एंट्री होते, ज्याच्या आयुष्यात कोणतंही ठराविक लक्ष्य नाही. मात्र एका घटनेमुळे तो या दोन्ही गुंडांचा शत्रू बनतो. चित्रपटात अॅक्शन सीनची रेलचेल आहे आणि बॉक्स ऑफिसवरही हा सिनेमा यशस्वी ठरला होता.
ए.आर. मुरुगदास दिग्दर्शित या अॅक्शन थ्रिलरला आयएमडीबीकडून ७.३ असे प्रभावी रेटिंग मिळाले आहे. शिवा कार्तिकेयन, रुक्मिणी वसंत आणि विद्युत जामवाल यांच्या प्रमुख भूमिका असलेला हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्म अमेझॉन प्राइम व्हिडीओवर (Amazon Prime Video) नंबर एकवर ट्रेंडिंग करत आहे. या धमाकेदार चित्रपटाचं नाव आहे 'मधरासी' (Madharaasi). या चित्रपटाचे पार्श्वसंगीत जबरदस्त आहे. ते या चित्रपटाचे थ्रिल वाढवते.