प्रभासचा आगामी सिनेमा 'फौजी'मध्ये दिसणार मृणाल ठाकूर?, अभिनेत्री म्हणाली....

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2024 17:32 IST2024-08-17T17:31:37+5:302024-08-17T17:32:17+5:30

Prabhas And Mrunal Thakur : प्रभासच्या 'फौजी' या नव्या चित्रपटासाठी अभिनेत्री मृणाल ठाकूरच्या नावाची चर्चा आहे.

Mrunal Thakur will be seen in Prabhas' upcoming movie 'Fauji'?, the actress said.... | प्रभासचा आगामी सिनेमा 'फौजी'मध्ये दिसणार मृणाल ठाकूर?, अभिनेत्री म्हणाली....

प्रभासचा आगामी सिनेमा 'फौजी'मध्ये दिसणार मृणाल ठाकूर?, अभिनेत्री म्हणाली....

मृणाल ठाकूर (Mrunal Thakur) प्रभास(Prabhas)च्या आगामी चित्रपट 'फौजी'(Fauji)मध्ये दिसणार असल्याचे वृत्त आहे. 'कल्की 2898 एडी'मध्ये ही जोडी दिसली होती. मृणाल 'फौजी' चित्रपटात असल्याची बातमी येताच चाहते उत्सुक झाले आहेत. मात्र आता अभिनेत्रीने या चित्रपटावर आपले मौन सोडले आहे.

मृणाल ठाकूरने 'फौजी'मधील तिच्या कास्टिंगच्या बातम्या अफवा असल्याचे सांगत फेटाळून लावले आहे आणि सोशल मीडियावर एक अपडेट पोस्ट केली. वास्तविक, अलीकडेच एका न्यूज पोर्टलने एक पोस्ट शेअर केली होती, ज्यामध्ये मृणाल ठाकूर आणि प्रभासच्या फोटोसोबत लिहिले होते की, 'फौजी'मधील दोन्ही स्टार्सला पाहण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत. या चित्रपटाचा फर्स्ट लूक १७ ऑगस्टला रिलीज होणार आहे.

मृणाल ठाकूर म्हणाली...
या पोस्टच्या कमेंट सेक्शनमध्ये मृणाल ठाकूरने लिहिले की, मी 'फौजी'चा भाग नाही. मृणालने कमेंटमध्ये लिहिले की, 'माफ करा मी सगळी मजा खराब केली, पण मी या चित्रपटाचा भाग नाही.' 'फौजी'साठी श्रद्धा कपूरसोबत बोलणी सुरू असल्याच्याही बातम्या आहेत. दोघांनी 'साहो' चित्रपटात एकत्र काम केले होते. मात्र, तो चित्रपट फ्लॉप ठरला.

प्रभास आणि मृणाल ठाकूरचे आगामी चित्रपट
प्रोफेशनल फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर 'फौजी' व्यतिरिक्त प्रभास 'कनप्पा' आणि 'द राजा साहेब' मध्ये दिसणार आहे. त्याच वेळी, मृणाल ठाकूर 'फॅमिली स्टार' चित्रपटात दिसली होती, ज्यामध्ये तिचा नायक विजय देवरकोंडा होता. संजय लीला भन्साळी यांच्या एका चित्रपटाव्यतिरिक्त मृणाल आता 'पूजा मेरी जान'मध्ये दिसणार आहे.

Web Title: Mrunal Thakur will be seen in Prabhas' upcoming movie 'Fauji'?, the actress said....