२० कोटीचं बजेट अन् कमाई २४० कोटी! मैत्रीचा अर्थ उलगडणारा 'हा' चित्रपट डोळ्यात आणेल पाणी, तुम्ही पाहिलात?
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2025 15:33 IST2025-11-07T15:29:46+5:302025-11-07T15:33:28+5:30
२० कोटीचं बजेट अन् कमाई २४० कोटी! 'या' चित्रपटात एकही अभिनेत्री नाही; ओटीटीवर मिळतेय पसंती

२० कोटीचं बजेट अन् कमाई २४० कोटी! मैत्रीचा अर्थ उलगडणारा 'हा' चित्रपट डोळ्यात आणेल पाणी, तुम्ही पाहिलात?
Manjummel Boys : ओटीटीवर दर आठवड्याला नवनवे चित्रपट रिलीज केले जातात. त्यामुळे मनोरंजन अगदी सहज आणि सोप झालं आहे. या प्लॅटफॉर्ममुळे प्रेक्षकांना अगदी घरबसल्या जगभरातील कोणतीही कलाकृती पाहता येते.त्यामुळे अनेक सिनेप्रेमी थिएटरबरोबरच ओटीटीवर चित्रपट आणि वेब सीरीज पाहणं पसंत करतात. सध्या ओटीटी माध्यमावर अशाच एका चित्रपटाची चर्चा होत आहे. गेल्यावर्षीच प्रदर्शित झालेल्या या सिनेमाची अजूनही ओटीटीप्रेमींमध्ये चर्चा होताना दिसते. २० कोटींच्या बजेटमध्ये तयार करण्यात आलेल्या या चित्रपटाने महिनाभरातच २४० कोटींची कमाई करत रेकॉर्ड केला होता.
या बहुचर्चित चित्रपटाचं नाव मंजुमल बॉयज आहे. मळ्यालम चित्रपट मंजुमल बॉयज १२ फेब्रुवारी २०२४ ला प्रदर्शित झाला. या चित्रपटाला केवळ कमाईच्या बाबतीतच नव्हे तर कथा आणि कलाकारांचा अभिनय या बाबतीतही प्रेक्षक आणि समीक्षकांकडून दाद मिळाली.सत्य घटनेवर आधारित असलेल्या ‘मंजुम्मेल बॉईज’ या चित्रपटात एकही अभिनेत्री नाही.
‘मंजुम्मेल बॉईज’ हा चित्रपट ११ मित्रांच्या एका ग्रुपवर आधारित आहे. तामिळनाडूतील कोडाईकनाल या सुंदर हिल स्टेशनवर सुट्टी घालवण्यासाठी गेलेले हे मित्र आयुष्यभराचा अनुभव घेऊन परत येतात.या चित्रपटात मैत्रीचे अनेक पैलू आणि भावनिक प्रसंग दाखवण्यात आले आहेत. प्रेक्षकांना शेवटपर्यंत खिळवून ठेवणारा ‘मंजुम्मेल बॉईज’ डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहणार नाही. या चित्रपटाचे दिग्दर्शन चिदंबरम यांनी केलं होतं. केरळ राज्य चित्रपट पुरस्कार २०२४ मध्ये मंजुमल बॉईजने सर्वोत्कृष्ट पटकथा, सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकासह १० श्रेणींमध्ये पुरस्कार जिंकले.IMDb वर या चित्रपटाला १० पैकी ८.२ रेटिंग मिळाले आहेत. याशिवाय हा चित्रपट JioHotstar वर उपलब्ध आहे.