"अश्लील मेसेज करायचा, मला म्हणाला हॉटेलवर चल...", बड्या नेत्याची अभिनेत्रीकडून पोलखोल, केले गंभीर आरोप
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2025 11:38 IST2025-08-21T11:34:41+5:302025-08-21T11:38:03+5:30
मल्याळम अभिनेत्री रिनी एन जॉर्ज हिला राजकीय नेत्याने अश्लील मेसेज आणि फाइव्ह स्टार हॉटेलमध्ये जाण्याची ऑफर दिल्याचा खुलासा अभिनेत्रीने केला आहे.

"अश्लील मेसेज करायचा, मला म्हणाला हॉटेलवर चल...", बड्या नेत्याची अभिनेत्रीकडून पोलखोल, केले गंभीर आरोप
सिनेइंडस्ट्री आणि राजकारणाचा फार जवळचा संबंध राहिला आहे. अनेक राजकारणी नेते आणि कलाकार यांच्यात मैत्रीपूर्ण संबंध आहेत. पण, एका अभिनेत्रीला एका राजकीय नेत्याकडून मात्र वाईट अनुभव आला. मल्याळम अभिनेत्री रिनी एन जॉर्ज हिला राजकीय नेत्याने अश्लील मेसेज आणि फाइव्ह स्टार हॉटेलमध्ये जाण्याची ऑफर दिल्याचा खुलासा अभिनेत्रीने केला आहे.
रिनी जॉर्जने नुकतीच 'हिंदुस्तान टाइम्स'ला मुलाखत दिली. या मुलाखतीत तिने राजकीय नेत्याबाबत भाष्य केलं. रिनीने त्या नेत्याचं नाव सांगितलं नाही मात्र त्याच्या पक्षाच्या वरिष्ठांना याबाबत सांगूनही काहीच उपयोग झाला नसल्याचं तिने म्हटलं. "मला त्या नेत्याने अश्लील मेसेज पाठवले होते. त्याने मला एका ठिकाणी येण्यास सांगितलं होतं. जेव्हा मी त्याला धमकावलं तेव्हा त्याने मला चॅलेंज केलं. तो मला म्हणाला की जा जाऊन सांग...कोणाला फरक पडत नाही", असं रिनीने सांगितलं.
पुढे ती म्हणाली, "तो मला एकदा म्हणाला होता की चल फाइव्ह स्टार हॉटेलमध्ये रुम बुक करुया. तू येशील ना? त्यावेळेस मी त्याला चांगलंच सुनावलं होतं. त्यानंतर काही वेळ मला त्याने त्रास दिला नाही. पण, काही दिवसांनी पुन्हा तेच सुरू झालं. हे अनेकांसोबत घडलं आहे. मी सोशल मीडियामुळे त्या नेत्याच्या संपर्कात आले होते. ३ वर्षांपूर्वी त्याने मला अश्लील मेसेज पाठवला होता. त्याच्या पक्षातल्या वरिष्ठ नेत्यांकडे तक्रार करूनही काहीच उपयोग नाही. त्याच्यावर काहीच कारवाई होत नाही. त्या पक्षाची माझा मनात असलेली प्रतिमा आता नाहीशी झाली आहे".