सिनेसृष्टी हादरली! प्रसिद्ध अभिनेत्याचं अवघ्या २७व्या वर्षी निधन, राहत्या घरात आढळला मृतदेह
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2026 16:48 IST2026-03-12T16:47:53+5:302026-03-12T16:48:26+5:30
कलाविश्वातून एक दु:खद आणि खळबळजनक बातमी समोर येत आहे. मल्याळम चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्याचा अवघ्या २७व्या वर्षी मृत्यू झाला आहे. त्याच्या निधनाच्या बातमीने साऊथ इंडस्ट्री हादरली आहे.

सिनेसृष्टी हादरली! प्रसिद्ध अभिनेत्याचं अवघ्या २७व्या वर्षी निधन, राहत्या घरात आढळला मृतदेह
कलाविश्वातून एक दु:खद आणि खळबळजनक बातमी समोर येत आहे. मल्याळम चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्याचा अवघ्या २७व्या वर्षी मृत्यू झाला आहे. त्याच्या निधनाच्या बातमीने साऊथ इंडस्ट्री हादरली आहे. हरी मुलरी असं अभिनेत्याचं नाव असून त्याचं निधन झाल्याची बातमी समोर आली आहे. राहत्या घरातच त्याचा मृतदेह आढळल्याने सिनेसृष्टी हादरली आहे.
मीडिया रिपोर्टनुसार, पय्यानूर मधील अन्नूर येथील राहत्या घरात त्याचा मृतदेह आढळला. त्यानंतर तिथल्याच एका प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये त्याचा मृतदेह पाठवण्यात आला आहे. हरीमुरलीच्या मृत्यूचं नेमकं कारण अद्याप कळू शकलेलं नाही. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून लवकरच याबाबत अधिक माहिती समोर येईल. अद्याप त्याच्या मृत्यूची बातमी ऑफिशियल देण्यात आलेली नाही.
हरी मुरली हा प्रसिद्ध अभिनेते के.यु. मुरली उर्फ पय्यानूर मुरली यांचा मुलगा आहे. अभिनयाचं बाळकडू घरातूनच मिळाल्याने हरी मुरलीने बालकलाकार म्हणून काम करायला सुरुवात केली होती. त्याने आत्तापर्यंत जवळपास ५० सिनेमांमध्ये काम केलं होतं. रसीकन, अन्नन थम्पी, मादम्बी, डॉन, पट्टनथील भूतम अशा सिनेमांमध्ये तो झळकला होता. अनेक मोठ्या कलाकारांसोबत त्याने स्क्रीन शेअर केली होती. अभिनेता असण्यासोबतच व्हीएफएक्स आर्टिस्ट म्हणूनही तो काम करत होता. त्याच्या निधनावर शोक व्यक्त केला जात आहे.