गुंटूर करम: 6 दिवसांत केली 156.80 कोटींची कमाई; या सिनेमासाठी महेश बाबूने घेतलेलं मानधन पाहून डोळे होतील पांढरे
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2024 18:19 IST2024-01-19T18:19:19+5:302024-01-19T18:19:44+5:30
Mahesh babu: सध्या बॉक्स ऑफिसवर महेश बाबूचा हा सिनेमा धुमाकूळ घालत आहे.

गुंटूर करम: 6 दिवसांत केली 156.80 कोटींची कमाई; या सिनेमासाठी महेश बाबूने घेतलेलं मानधन पाहून डोळे होतील पांढरे
सध्या बॉक्स ऑफिसवर अनेक दाक्षिणात्य सिनेमांची चलती असल्याचं दिसून येत आहे. हनुमान, गुंटूर करम हे सिनेमा तर बॉक्स ऑफिस दणाणून सोडत आहेत. विशेष म्हणजे गुंटूर करम या सिनेमाने अवघ्या ६ दिवसांमध्ये 156.80 कोटींची कमाई केली आहे. त्यामुळे या सिनेमाने भल्याभल्या बॉलिवूड सिनेमांना पिछाडीवर टाकलं आहे. गुंटूर करम या सिनेमात अभिनेता महेश बाबू याने मुख्य भूमिका साकारली असून त्याने या सिनेमासाठी तगडं मानधन घेतलं आहे. इतकंच नाही तर त्याने घेतलेलं मानधन पाहात तो पुन्हा एकदा साऊथमधील महागडा अभिनेता ठरला आहे.
सरकारु वारी पाटा या सिनेमाच्या यशानंतर महेश बाबू त्रिविक्रम दिग्दर्शित गुंटूर करम या सिनेमात झळकला. हा सिनेमा नुकताच रिलीज झाला असून या सिनेमाने पहिल्या दिवसापासून बॉक्स ऑफिसवर आपला गड राखला आहे. २०० कोटींच्या बजेटमध्ये तयार झालेल्या या सिनेमाने आतापर्यंत तगडी कमाई केली आहे. विशेष म्हणजे पहिल्या ६ दिवसांमध्येच या सिनेमाने 156.80 कोटी रुपये कमावले. त्यामुळे सध्या या सिनेमातील कलाकार आणि त्यांनी स्वीकारलेलं मानधन यांची चर्चा रंगली आहे.
मीडिया रिपोर्टनुसार, महेश बाबूने या सिनेमासाठी तब्बल ७८कोटी रुपयांचं मानधन घेतलं आहे. त्यामुळे साऊथ इंडस्ट्रीतील महागडा अभिनेता म्हणून त्याच्याकडे पाहिलं जात आहे.
दरम्यान, गुंटूर करम या सिनेमात महेश बाबूसोबत अभिनेत्री मीनाक्षी चौधरी आणि श्रीलीला यांनी स्क्रीन शेअर केली आहे. तसंच राम्या कृष्णा, ब्रह्मानंदम, सुनील, जयराम आणि जगपति बाबू ही कलाकार मंडळी सुद्ध महत्त्वपूर्ण भूमिकेत झळकले आहेत.