"मन व्यथित झालंय, या अपार दुःखाच्या क्षणी" अजित पवारांच्या निधनानंतर पवन कल्याण भावुक
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2026 12:19 IST2026-01-28T12:17:06+5:302026-01-28T12:19:58+5:30
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं बारामती येथे विमान अपघातात दु:खद मृत्यू झाला आहे.

"मन व्यथित झालंय, या अपार दुःखाच्या क्षणी" अजित पवारांच्या निधनानंतर पवन कल्याण भावुक
Ajit Pawar Death Plane Crash : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातामध्ये निधन झाले आहे. बारामती विमानतळाजवळ लँडिगवेळी हा अपघात झाला. सकाळी ८.५० च्या सुमारास विमान लँडिग करत असताना हा अपघात झाला. या अपघातामध्ये एकूण पाच जणांचा मृत्यू झाला आहे. महाराष्ट्राचं लाकडं नेतृत्त्व असलेल्या दादांच्या अशा अकाली एक्झिटने सर्वांनाचा मोठा धक्का बसला आहे, देशभरात शोक व्यक्त केला जात आहे. अजित पवारांच्या निधनाचे वृत्त समजताच आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांनी शोक व्यक्त केला.
एक्सवर एक ट्विट करत पवन कल्याण यांनी श्रद्धांजली वाहिली. "आज झालेल्या भीषण विमान अपघातात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष तसेच एनडीए आघाडीचे नेते अजित पवार यांच्या दुःखद निधनाची बातमी ऐकून मन अत्यंत व्यथित झाले आहे. महाराष्ट्रातील जनतेच्या कल्याण आणि विकासासाठी त्यांनी दिलेले समर्पित सार्वजनिक योगदान सदैव स्मरणात राहील. जनतेप्रती त्यांची निष्ठा आणि बांधिलकी कायम आदराने आठवली जाईल. या अपार दुःखाच्या क्षणी त्यांच्या कुटुंबीयांप्रती, समर्थकांप्रती आणि पक्षाच्या कार्यकर्त्यांप्रती मी मनःपूर्वक शोकसंवेदना व्यक्त करतो", असे पवन कल्याण यांनी शोक संदेशात म्हटले आहे.
Deeply shocked by the tragic news of the passing of the Maharashtra Deputy Chief Minister, President of @mahancpspeaks, and an NDA alliance leader, Sri Ajit Dada Pawar ji @AjitPawarSpeaks, in a devastating plane crash today.
— Pawan Kalyan (@PawanKalyan) January 28, 2026
His dedicated public service and immense contributions… pic.twitter.com/kjUPAcHWdJ
विमानाचे लँडिंग चुकले...
अपघाताच्या वेळी घटनास्थळी उपस्थित असलेल्या एका प्रत्यक्षदर्शीने दिलेली माहिती अंगावर शहारे आणणारी आहे. त्यांनी सांगितले की, "स्वतःच्या डोळ्यांनी हा अपघात पाहिला. खूप दुःखद घटना होती. विमान लँडिंगसाठी खाली येत होते, तेव्हाच काहीतरी अघटित घडणार याची जाणीव झाली. विमान खाली येताना वाटत होतं की ते कोसळेल आणि तितक्यातच ते कोसळले आणि त्यात फोटो स्फोट झाला. आम्ही मदतीसाठी धावलो, पण विमानाने भीषण पेट घेतला होता. आम्ही जवळ पोहोचलो तेव्हा विमानात एकापाठोपाठ एक ४ ते ५ भीषण स्फोट झाले.