लग्नानंतर पहिल्यांदाच पब्लिकली स्पॉट झाली कीर्ती सुरेश, फ्लॉन्ट केलं मंगळसूत्र
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2024 13:56 IST2024-12-19T13:55:26+5:302024-12-19T13:56:23+5:30
Keerthy Suresh: कीर्ती सुरेशने नुकतेच गोव्यात तिचा बॉयफ्रेंड अँटनी थैटिलसोबत लग्न केले. लग्नानंतर अभिनेत्री पहिल्यांदाच सार्वजनिक ठिकाणी दिसली.

लग्नानंतर पहिल्यांदाच पब्लिकली स्पॉट झाली कीर्ती सुरेश, फ्लॉन्ट केलं मंगळसूत्र
कीर्ती सुरेश ही दक्षिण चित्रपटसृष्टीतील सर्वात जास्त मागणी असलेल्या अभिनेत्रींपैकी एक आहे. अभिनेत्रीचा वरुण धवनसोबतचा 'बेबी जॉन' हा सिनेमा रिलीज होणार आहे. रिलीज होण्याआधीच या चित्रपटाची जोरदार चर्चा आहे. या सगळ्यामध्ये कीर्ती तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत असते. वास्तविक, अभिनेत्रीने अलीकडेच तिचा दीर्घकाळचा प्रियकर अँटोनीसोबत गोव्यात डेस्टिनेशन वेडिंग केले होते. या जोडप्याने प्रथम दक्षिण भारतीय रितीरिवाजानुसार सात फेरे घेतले आणि नंतर ख्रिश्चन पद्धतीने लग्न केले. कीर्ती लग्नानंतर पहिल्यांदाच सार्वजनिक ठिकाणी दिसली आहे.
कीर्ती सुरेश सध्या चर्चेत आली आहे. नुकतेच तिने तिचा प्रियकर अँटोनी थैटिलशी लग्न केले. दोघेही १५ वर्षांपासून डेट करत होते आणि आता या जोडप्याने त्यांच्या प्रेमाला लग्नाचे नाव दिले आहे. गोव्यातील ग्रँड वेडिंगनंतर कीर्ती काल सार्वजनिकरित्या स्पॉट झाली. यावेळी कीर्ती खूपच स्टायलिश अंदाजात दिसली. अभिनेत्रीने सिल्व्हर रंगाचा झगमगणारा ड्रेस परिधान केला होता. थ्री-फोर्थ स्लीव्हज असलेल्या थाई हाय स्लिट गाउनमध्ये कीर्ती अप्रतिम दिसत होती. कीर्तीने तिच्या आउटफिटवर पांढऱ्या आणि काळ्या हिल्स घातली आहे. अभिनेत्रीने थोडासा मेकअप केला होता. यावेळी लक्ष वेधून घेतलेली गोष्ट म्हणजे तिचे मंगळसूत्र. अभिनेत्रीने सोन्याचे मंगळसूत्र घातले होते. कीर्तीचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
कीर्तीच्या लग्नाला थलापती विजयने लावली होती हजेरी
कीर्ती सुरेशनेही तिच्या लग्नाचे हृदयस्पर्शी फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. अभिनेत्रीच्या लग्नाला सुपरस्टार थलापती विजयनेही हजेरी लावली होती. कीर्तीने शेअर केलेल्या फोटोमध्ये विजय नवविवाहित जोडप्याला आशीर्वाद देताना दिसत आहे.
कीर्ती सुरेश वर्कफ्रंट
वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर कीर्ती सुरेश बेबी जॉनसोबत तिच्या बॉलिवूड डेब्यूची तयारी करत आहे. एटलीच्या या चित्रपटात वरुण धवनने मुख्य भूमिका साकारली आहे. हा चित्रपट ख्रिसमसला म्हणजेच २५ डिसेंबरला थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.