तारीख ठरली! थिएटरनंतर 'कांतारा चॅप्टर १' आता फक्त दोन दिवसांत 'या' ओटीटीवर होणार रिलीज

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2025 09:35 IST2025-10-28T09:27:00+5:302025-10-28T09:35:15+5:30

याचा अर्थ, थिएटरमध्ये प्रदर्शित झाल्यानंतर एका महिन्याच्या आतच हा ब्लॉकबस्टर चित्रपट प्रेक्षकांना घरबसल्या पाहता येणार आहे.

Kantara Chapter 1 will be released on OTT on Amazon Prime Video see details | तारीख ठरली! थिएटरनंतर 'कांतारा चॅप्टर १' आता फक्त दोन दिवसांत 'या' ओटीटीवर होणार रिलीज

तारीख ठरली! थिएटरनंतर 'कांतारा चॅप्टर १' आता फक्त दोन दिवसांत 'या' ओटीटीवर होणार रिलीज

Kantara Chapter 1 OTT Release : कन्नड सुपरस्टार  (Rishab Shetty) अभिनित आणि दिग्दर्शित 'कांतारा चॅप्टर १' (Kantara Chapter 1) या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर ऐतिहासिक यश मिळवल्यानंतर आता तो डिजिटल प्लॅटफॉर्मवर धुमाकूळ घालायला सज्ज झाला आहे. निर्मात्यांनी सोमवारी (२७ ऑक्टोबर) या चित्रपटाच्या ओटीटी रिलीजची (OTT Release) अधिकृत घोषणा केली आहे. ज्यामुळे चाहत्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. 

चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित झाल्यानंतर ४५ ते ६० दिवसांनी ओटीटीवर येतो. मात्र, 'कांतारा चॅप्टर १' च्या बाबतीत निर्मात्यांनी हा नियम मोडला आहे. 'कांतारा चॅप्टर १' हा चित्रपट ३१ ऑक्टोबर रोजी ऑनलाइन प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचे स्ट्रीमिंग ओटीटी प्लॅटफॉर्म अमेझॉन प्राइम व्हिडीओ (Amazon Prime Video) वर केले जाईल. याचा अर्थ, थिएटरमध्ये प्रदर्शित झाल्यानंतर एका महिन्याच्या आतच हा ब्लॉकबस्टर चित्रपट प्रेक्षकांना घरबसल्या पाहता येणार आहे.

सध्या 'कांतारा चॅप्टर १' प्राइम व्हिडीओवर कन्नड, तमिळ, तेलुगू आणि मल्याळम या चार दक्षिण भारतीय भाषांमध्ये स्ट्रीम केला जाईल. मात्र, हिंदी प्रेक्षकांसाठी एक मोठी निराशा आहे. कारण चित्रपटाच्या हिंदी ओटीटी रिलीजची घोषणा अद्याप झालेली नाही.  २०२२ मध्ये प्रदर्शित झालेल्या 'कांतारा' चित्रपटाबाबतही अशीच परिस्थिती होती. 'कांतारा'ची हिंदी आवृत्ती प्राइम व्हिडीओनंतर नंतर नेटफ्लिक्सवर रिलीज करण्यात आली होती. त्यामुळे, 'कांतारा चॅप्टर १' ची हिंदी आवृत्ती देखील प्राइम व्हिडीओवरील प्रदर्शनानंतर नेटफ्लिक्सवर स्ट्रीम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.


बॉक्स ऑफिसवर रचला इतिहास
'कांतारा चॅप्टर १' च्या बॉक्स ऑफिसवरील कामगिरीचा विचार केल्यास, यावर्षी जगभरात सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांपैकी हा एक आहे. या चित्रपटाने जगभरात तब्बल ८१२ कोटी रुपये इतका प्रचंड गल्ला जमवला असून, जागतिक स्तरावर चित्रफटाने मोठे यश संपादन केले आहे. ज्या प्रेक्षकांना हा शानदार थ्रिलर थिएटरमध्ये पाहता आला नाही, त्यांच्यासाठी ओटीटी रिलीज एक मोठी पर्वणी ठरणार आहे.

Web Title : 'कांतारा चैप्टर 1' ओटीटी रिलीज की तारीख घोषित: स्ट्रीमिंग जल्द!

Web Summary : ऋषभ शेट्टी की 'कांतारा चैप्टर 1', एक बॉक्स ऑफिस हिट, 31 अक्टूबर को अमेज़ॅन प्राइम वीडियो पर रिलीज होगी। शुरू में दक्षिण भारतीय भाषाओं में उपलब्ध, हिंदी रिलीज की तारीख अभी घोषित नहीं की गई है, जो पहली 'कांतारा' फिल्म की रिलीज रणनीति को दर्शाती है।

Web Title : 'Kantara Chapter 1' OTT Release Date Confirmed: Streaming Soon!

Web Summary : Rishab Shetty's 'Kantara Chapter 1,' a box office hit, will release on Amazon Prime Video on October 31st. Initially available in South Indian languages, a Hindi release date is yet to be announced, mirroring the release strategy of the first 'Kantara' film.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.