'कांतारा चॅप्टर १' सिनेमाचं बॉक्स ऑफिसवर वादळ! अवघ्या तीन दिवसात कमावले तब्बल 'इतके' कोटी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2025 10:54 IST2025-10-05T10:52:49+5:302025-10-05T10:54:39+5:30

'कांतारा: चॅप्टर १' सिनेमा पाहायला थिएटरमध्ये हाऊसफुल्ल गर्दी होत असून सिनेमाने तीन दिवसात बक्कळ कमाई केली आहे

Kantara Chapter 1 takes the box office by storm know 3 days collection details | 'कांतारा चॅप्टर १' सिनेमाचं बॉक्स ऑफिसवर वादळ! अवघ्या तीन दिवसात कमावले तब्बल 'इतके' कोटी

'कांतारा चॅप्टर १' सिनेमाचं बॉक्स ऑफिसवर वादळ! अवघ्या तीन दिवसात कमावले तब्बल 'इतके' कोटी

ऋषभ शेट्टीचा (Rishab Shetty) 'कांतारा: चॅप्टर १' (Kantara: A Legend - Chapter 1) हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला आहे. प्रदर्शनाच्या पहिल्याच वीकेंडमध्ये या सिनेमाने जगभरात २०० कोटींहून अधिक कमाई करत अनेक मोठे विक्रम मोडले आहेत. एकूणच पहिल्या भागाच्या तुलनेत भव्यदिव्य असलेला  'कांतारा: चॅप्टर १' सिनेमा लोकांच्या पसंतीस उतरत आहे. जाणून घ्या सिनेमाच्या कमाईबद्दल

'कांतारा: चॅप्टर १'ची तीन दिवसांतील कमाई

'सॅकनिल्क' (Sacnilk) या वृत्तसंस्थेच्या अहवालानुसार, चित्रपटाने पहिल्या तीन दिवसांत (बुधवार ते शनिवार) भारतात १६२.८५ कोटींचं कलेक्शन केलं आहे. पहिला दिवस (बुधवार, दसरा): ६१.८५ कोटी, दुसरा दिवस (शुक्रवार): ४६.०० कोटी तर तिसरा दिवस (शनिवार): ५५.०० कोटी, अशी सिनेमाची कमाई झाली असून जगभरातील एकूण कमाई  तीन दिवसांत २२५ कोटी इतकी झाली आहे.

हा चित्रपट अवघ्या दोन दिवसांत १०० कोटी (भारतात) आणि तीन दिवसांत २०० कोटी (जगभरात) कमावणारा सर्वात जलद कन्नड चित्रपट ठरला आहे. या सिनेमाने सलमान खानचा 'सिकंदर' (Sikandar) आणि राम चरणचा 'गेम चेंजर' (Game Changer) यांसारख्या मोठ्या चित्रपटांचे 'लाईफटाईम कलेक्शन' चे विक्रमही मोडले आहेत. १२५ कोटी बजेट असलेल्या या चित्रपटाने तीन दिवसांत आपले बजेटचे पैसे वसूल केले आहेत, ज्यामुळे तो ब्लॉकबस्टर ठरला आहे.

या चित्रपटाचा कमाईचा वेग पाहता, पहिल्या चार दिवसांत हा सिनेमा २५० कोटी कमाईचा आकडा गाठेल, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. 'कांतारा: चॅप्टर १' हा २०२२ च्या सुपरहिट 'कांतारा'चा प्रीक्वल असून तो कन्नडसह हिंदी, तेलुगू, तमिळ आणि मल्याळम भाषेत प्रदर्शित झाला आहे.

Web Title : 'कांतारा: चैप्टर 1' की बॉक्स ऑफिस पर धूम, दिनों में कमाए करोड़!

Web Summary : ऋषभ शेट्टी की 'कांतारा: चैप्टर 1' बॉक्स ऑफिस पर हिट, तीन दिनों में दुनिया भर में ₹225 करोड़ से अधिक कमाए। फिल्म ने रिकॉर्ड तोड़े और बड़ी फिल्मों के लाइफटाइम कलेक्शन को पार किया, बजट वसूला और ब्लॉकबस्टर बन गई।

Web Title : 'Kantara: Chapter 1' storms box office, earns crores in days!

Web Summary : Rishab Shetty's 'Kantara: Chapter 1' is a box office hit, earning over ₹225 crore worldwide in three days. The film has broken records and surpassed lifetime collections of major films, recovering its budget and becoming a blockbuster.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.