मंडे टेस्टमध्ये ऋषभ शेट्टीच्या 'कांतारा चाप्टर १'ने मारली बाजी! कमावले 'इतके' कोटी
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2025 12:42 IST2025-10-07T12:42:21+5:302025-10-07T12:42:58+5:30
'कांतारा चाप्टर १'ने बॉक्स ऑफिसवर वादळ आणलं आहे. २०२५ चा सर्वात जास्त कमावणारा सिनेमा म्हणून 'कांतारा चाप्टर १'कडे बघितलं जातंय

मंडे टेस्टमध्ये ऋषभ शेट्टीच्या 'कांतारा चाप्टर १'ने मारली बाजी! कमावले 'इतके' कोटी
अभिनेता ऋषभ शेट्टी (Rishab Shetty) अभिनित आणि दिग्दर्शित 'कांतारा चॅप्टर १' (Kantara Chapter 1) हा कन्नड चित्रपट बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई करत आहे. दसऱ्याच्या मुहूर्तावर प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने पहिल्या सोमवारच्या कमाईतही मोठी झेप घेतली आहे. पहिल्या पाच दिवसात 'कांतारा चॅप्टर १'च्या कमाईचा आकडा वाचून थक्कच व्हाल
'कांतारा चॅप्टर १' बॉक्स ऑफिस कलेक्शन
ट्रेंड रिपोर्टनुसार, 'कांतारा चॅप्टर १' ने रिलीजच्या पाचव्या दिवशी म्हणजेच पहिल्या सोमवारी तब्बल ३०.५० कोटी रुपये कमावले आहेत. यासह, चित्रपटाची एकूण कमाई आता २५५.७५ कोटी रुपये झाली आहे. चित्रपटाच्या जगभरातील कमाईवर नजर पुढीलप्रमाणे
पहिला दिवस (शुक्रवार): ६१ कोटी रुपये
दुसरा दिवस (शनिवार): ४५.४ कोटी रुपये
तिसरा दिवस (रविवार): ५५ कोटी रुपये
चौथा दिवस (सोमवार): ६३ कोटी रुपये
'KGF 1' सह अनेक चित्रपटांचे रेकॉर्ड मोडले
रिलीजच्या अवघ्या पाच दिवसांत 'कांतारा चॅप्टर १' ने बॉक्स ऑफिसवर अनेक मोठे विक्रम मोडले आहेत आणि तो वर्षातील सर्वाधिक कमाई करणारा कन्नड चित्रपट बनला आहे. हा चित्रपट लवकरच ३०० कोटी रुपयांचा टप्पा पार करेल, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे.
'कांतारा चॅप्टर १' बद्दल सांगायचं तर, हा चित्रपट 'कांतारा'च्या मूळ कथेच्या एक हजार वर्षे आधीची गोष्ट सांगतो. यात कांताराचे जंगली गाव आणि शेजारील कदंब राजघराण्यातील संघर्षाची कहाणी आहे. ऋषभ शेट्टीने यात बर्मे ही मुख्य भूमिका साकारली आहे. 'कांतारा'चा पहिला भाग १५ कोटी रुपयांच्या बजेटमध्ये बनला होता, पण त्याने जगभरात ४०० कोटींहून अधिक कमाई केली होती.