भयानक दुनियेची भन्नाट झलक! सूर्या - बॉबी देओलच्या 'कंगुआ'चा चित्तथरारक टिझर पाहाच
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2024 18:39 IST2024-03-19T18:36:58+5:302024-03-19T18:39:23+5:30
बॉबी देओल - सूर्याच्या कंगुआचा अंगावर काटा आणणारा टिझर बघाच.

भयानक दुनियेची भन्नाट झलक! सूर्या - बॉबी देओलच्या 'कंगुआ'चा चित्तथरारक टिझर पाहाच
गेल्या अनेक महिन्यांपासून 'कंगुआ' सिनेमाची उत्कंठा शिगेला होती. साऊथ सुपरस्टार सुर्याचा हा सिनेमा २०२४ मधील बहुप्रतिक्षित सिनेमांपैकी एक म्हणून ओळखला जातोय. विशेष म्हणजे 'अॅनिमल' गाजवून बॉबी देओल 'कंगुआ' सिनेमातून पुन्हा एकदा खलनायकाच्या भूमिकेत झळकणार आहे. अखेर 'कंगुआ'चा उत्कंठावर्धक टिझर रिलीज झाला आहे. या टिझरमध्ये एका भयानक दुनियेची झलक पाहायला मिळतेय.
'कंगुआ'च्या टिझरमध्ये एक वेगळीच दुनिया पाहायला मिळते. जी क्वचितच भारतीय सिनेमांमध्ये आपण पाहिली असेल. टिझर पाहून लक्षात येतं की, साम्राज्य मिळवण्यासाठी दोन गटांमध्ये तुल्यबळ स्पर्धा दिसुन येते. एकीकडे सुर्या स्वतःच्या लोकांना वाचवण्यासाठी जीवाचं रान करताना दिसतो तर दुसरीकडे शांत दिसत असलेला बॉबी देओल सुर्याला नेस्तनाबूत करण्यासाठी कोणत्याही थराला जातोय.
'कंगुआ'चा टिझर एवढा जबरदस्त झालाय तर सिनेमाही चांगलाच असेल यात काही शंका नाही. हा टिझर अल्पावधीत व्हायरल झाला असून ट्विटरवर ट्रेंड करतोय. सुर्याच्या फॅन्सनी त्याच्या लूकला चांगलीच पसंती दिली आहे. तर दुसरीकडे बॉबी देओलनेही सर्वांना सरप्राईज करुन सोडलंय. शिवा यांनी 'कंगुआ'चं दिग्दर्शन केलं असून देवी प्रसाद यांनी संगीत दिलंय. सिनेमा 3D त पाहायला मिळणार असून जगभरातील ३८ भाषांमध्ये सिनेमा रिलीज होणार आहे.