ओटीटीवर कधी आणि कुठे प्रदर्शित होणार सूर्या आणि बॉबी देओलचा 'कांगुवा' सिनेमा?
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2024 11:23 IST2024-12-02T10:58:32+5:302024-12-02T11:23:53+5:30
सूर्या आणि बॉबी देओलचा 'कांगुवा' सिनेमा लवकरच ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे.

ओटीटीवर कधी आणि कुठे प्रदर्शित होणार सूर्या आणि बॉबी देओलचा 'कांगुवा' सिनेमा?
Kanguva Ott Release : तुमचा थिएटरमध्ये 'कांगुवा' चित्रपट बघायला राहून गेला आहे का? हो... तर मग तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. आता लवकरच हा सिनेमा ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे. साऊथचा सुपरस्टार सूर्या आणि अभिनेता बॉबी देओल यांची प्रमुख भुमिका असलेला हा चित्रपट कुठे आणि कधी पाहायला मिळणार हे जाणून घेण्यासाठी सर्वजण उत्सुक आहेत. चला तर जाणून घेऊया...
'कांगुवा' सिनेमाचे ओटीटी अधिकार Amazon Prime Video ने तब्बल 100 कोटी रुपयांना विकत घेतले आहेत. येत्या 13 डिसेंबर 2024 पासून हा सिनेमा स्ट्रीम होईल. नवभारत टाईम्सने याबाबत वृत्त दिलं आहे. 'कांगुवा' हा थिएटरमध्ये 14 नोव्हेंबर रोजी प्रदर्शित झाला होता. हा चित्रपट 400 कोटींच्या बजेटमध्ये बनला. पण, सिनेमानं बॉक्स ऑफिसवर आतापर्यंत सुमारे 68 कोटींची कमाई केली आहे. त्यामुळे तसं पाहिलं तर हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर कमालीचा अपयशी ठरला आहे.
शिवा यांनी 'कांगुवा'चं दिग्दर्शन केलं असून देवी प्रसाद यांनी संगीत दिलंय. 'पुनर्जन्म', 'विश्वासघात', 'सम्मान' यावर 'कंगुवा' सिनेमाची कथा आधारित आहे. आधुनिक युग आणि प्राचीन युग अशा दोन टाईमलाईनवर सिनेमा आहे. सिनेमाचं शूट भारताशिवाय 7 वेगवेगळ्या देशात झालं आहे. दरम्यान, 'कांगुवा' या चित्रपटाची 2019 मध्ये 'सूर्या 39' म्हणून पहिल्यांदा घोषणा करण्यात आली होती, परंतु कोविड-19 साथीमुळे विलंब झाला. त्याचे शूटिंग 2022 मध्ये 'सुर्या 42' या शीर्षकाखाली पुन्हा सुरू झाले परंतु अखेरीस त्याचे नाव 'कांगुवा' ठेवण्यात आले.