काजल अग्रवालचं अपघातात निधन? अफवेवर अभिनेत्रीनं सोडलं मौन, म्हणाली- "मी पूर्णपणे..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2025 11:46 IST2025-09-09T11:45:30+5:302025-09-09T11:46:02+5:30

Kajal Aggarwal : अभिनेत्री काजल अग्रवाल यांच्याबद्दल एक धक्कादायक बातमी समोर आली होती की, तिचा एका रस्ते अपघातात मृत्यू झाला आहे. पण आता अभिनेत्री स्वतः समोर आली आणि तिने सत्य सांगितले. ती म्हणाली की, खोट्या बातम्या पसरवू नका, मी पूर्णपणे ठीक आहे. तिची ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Kajal Aggarwal died in an accident? Actress breaks silence on rumours, says- ''I am completely...'' | काजल अग्रवालचं अपघातात निधन? अफवेवर अभिनेत्रीनं सोडलं मौन, म्हणाली- "मी पूर्णपणे..."

काजल अग्रवालचं अपघातात निधन? अफवेवर अभिनेत्रीनं सोडलं मौन, म्हणाली- "मी पूर्णपणे..."

दाक्षिणात्य आणि हिंदी चित्रपटांमधील प्रसिद्ध अभिनेत्री काजल अग्रवाल(Kajal Aggarwal)बाबत एक धक्कादायक बातमी समोर आली होती. काही रिपोर्ट्समध्ये दावा करण्यात आला होता की, रस्ते अपघातात तिचा मृत्यू झाला आहे. ही अफवा सोशल मीडियावर वेगाने पसरू लागली. यानंतर अभिनेत्रीला स्वतः समोर येऊन ही अफवा फेटाळून लावले आहे.

काजल अग्रवालने इंस्टाग्रामवर तिच्या मृत्यूची व्हायरल होत असलेली बातमी निराधार असल्याचे सांगितले. 'माझ्याबद्दल काही निराधार बातम्या समोर आल्या आहेत, ज्यात माझा अपघात झाल्याचा आणि आता मी या जगात नसल्याचा दावा करण्यात आला आहे. खरं सांगायचं तर, हे खूपच मजेशीर आहे, कारण हे खोटं आहे,' असे तिने लिहिले.

''मी पूर्णपणे ठीक आहे''
अभिनेत्रीने पुढे सांगितले की, ''देवाच्या कृपेने, मी तुम्हा सर्वांना खात्री देऊ इच्छिते की मी पूर्णपणे ठीक, सुरक्षित आणि खूप आनंदी आहे. अशा खोट्या बातम्यांवर विश्वास ठेवू नका आणि त्या पसरवू नका, अशी माझी तुम्हा सर्वांना विनंती आहे.''

वर्कफ्रंट
चित्रपटांबद्दल बोलायचं झाल्यास, काजलने २००४ मध्ये 'क्यों! हो गया ना' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. त्या तमिळ आणि तेलुगू सिनेमामध्ये एक मोठे नाव आहेत. त्यांनी अलीकडेच 'कन्नप्पा' या चित्रपटात महत्त्वाची भूमिका केली आहे. काजल लवकरच 'द इंडियन स्टोरी', 'इंडियन ३' आणि 'रामायणम्' या चित्रपटांमध्ये दिसणार आहे. यामध्ये रणबीर कपूरपासून ते साई पल्लवी, सनी देओल, यश आणि रवी दुबे यांसारखे मोठे कलाकार आहेत. वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचं झाल्यास, काजलने २०२० मध्ये उद्योगपती गौतम किचलू यांच्याशी लग्न केले. त्यांना नील नावाचा एक मुलगा आहे.
 

Web Title: Kajal Aggarwal died in an accident? Actress breaks silence on rumours, says- ''I am completely...''

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.