"आयकॉन स्टार" अल्लू अर्जुनच्या शिरपेचात मानाचा तुरा, 'या' पुरस्कारानं झाला गौरव

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2025 18:11 IST2025-05-29T18:10:02+5:302025-05-29T18:11:21+5:30

अल्लू अर्जूनच्या करिअरची गाडी सध्या चांगलीच धावतेय.

Gaddar Telangana Film Awards Allu Arjun Bags Best Actor For Pushpa 2 | "आयकॉन स्टार" अल्लू अर्जुनच्या शिरपेचात मानाचा तुरा, 'या' पुरस्कारानं झाला गौरव

"आयकॉन स्टार" अल्लू अर्जुनच्या शिरपेचात मानाचा तुरा, 'या' पुरस्कारानं झाला गौरव

दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जुन (Allu Arjun) हा सध्याच्या काही आघाडीच्या अभिनेत्यांमधील एक लोकप्रिय अभिनेता आहे.  डिसेंबर २०२४ मध्ये प्रदर्शित त्याच्या 'पुष्पा २' चित्रपटाच्या बॉक्स ऑफिसवरील दमदार कामगिरीने केवळ कमाईचेच रेकॉर्ड मोडले नाहीत, तर त्याला भारतातील सर्वांत लोकप्रिय स्टारही बनवलं. आता त्याचा चाहतावर्ग वाढलाय आणि त्याची कारकीर्दही एका नवीन उंचीवर गेलीय. अल्लू अर्जूनच्या करिअरची गाडी सध्या चांगलीच धावतेय.  अशातच आता 'पुष्पा २: द रूल'मधील दमदार भूमिकेसाठी त्याचा तेलंगणा सरकारतर्फे 'गद्दार तेलंगणा फिल्म पुरस्कार २०२४' अंतर्गत पहिला सर्वोत्कृष्ट अभिनेता पुरस्काराने गौरवण्यात आलंय.

या खास प्रसंगी अल्लू अर्जुननं आपल्या अधिकृत सोशल मीडियावर पोस्ट शेअरक करत आनंद व्यक्त केलाय. तिनं लिहलं,  "मला 'गद्दार तेलंगणा फिल्म पुरस्कार २०२४'मध्ये 'पुष्पा २'साठी पहिला सर्वोत्कृष्ट अभिनेता पुरस्कार मिळाल्याचा अभिमान आहे. तेलंगणा सरकारचे मन:पूर्वक आभार. हा पुरस्कार माझे दिग्दर्शक सुकुमार गरू, निर्माते आणि संपूर्ण 'पुष्पा' टीमला समर्पित करतो. आणि सर्वात मोठे आभार माझ्या चाहत्यांचे, तुमचं प्रेम आणि पाठिंबा मला सतत प्रेरणा देतं", या शब्दात त्याने आपल्या भावना व्यक्त केल्या. 


अल्लू अर्जूनशिवाय,  निवेथा थॉमसला '३५ चिन्ना कथा कडू' चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला आहे. यासोबतच सर्वोत्तम वैशिष्ट्यपूर्ण चित्रपट श्रेणीत  'कल्की २८९८ एडी', 'पोटेल' आणि 'लकी भास्कर' या तीन चित्रपटांचीही निवड करण्यात आली आहे. यात नाग अश्विन दिग्दर्शित 'कल्की २८९८ एडी'ची सर्वोत्कृष्ट चित्रपट म्हणून निवड झाली आहे. 

गायिका श्रेया घोषाल देखील विजेत्यांमध्ये आहे. ती 'पुष्पा २' चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट महिला पार्श्वगायिका ठरली आहे. सिद्धार्थ श्रीरामला 'ऊरु पेरू भैरवकोना' चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट पुरुष पार्श्वगायकाचा पुरस्कार मिळाला आहे. चंद्र बोस यांची 'राजू यादव' चित्रपटासाठी संगीत दिग्दर्शकाच्या श्रेणीत निवड झाली आहे. नवीन नूली यांना 'लकी भास्कर' चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट संपादक पुरस्कार मिळाला आहे. अरविंद मेनन यांना 'गामी' चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट ऑडिओग्राफरचा पुरस्कार मिळाला. त्याच वेळी, 'कल्की २८९८ एडी' साठी अदनितिन जिहानी चौधरी यांना सर्वोत्कृष्ट कला दिग्दर्शकाचा पुरस्कार मिळाला आहे. तेलुगू चित्रपट उद्योगाला प्रोत्साहन देण्यासाठी राज्य सरकारने तेलंगणा गद्दर चित्रपट पुरस्कार सुरू केले आहेत. १३ मार्चपासून या पुरस्कार सोहळ्यासाठी अर्ज मागवण्यात आले होते आणि आज म्हणजेच २९ मे रोजी २०२४ मध्ये प्रदर्शित झालेल्या चित्रपटांसाठी विजेत्यांची घोषणा करण्यात आली आहे. 

Web Title: Gaddar Telangana Film Awards Allu Arjun Bags Best Actor For Pushpa 2

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.