चाहत्याने विचारलं चमकणाऱ्या त्वचेचं रहस्य; समांथानं खरं काय ते सांगून टाकलं
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 20, 2023 14:26 IST2023-09-20T14:22:25+5:302023-09-20T14:26:39+5:30
अभिनेत्री समांथानं आपल्या चमकणाऱ्या त्वचेचं रहस्य चाहत्यांना सांगितलं.

Samantha Ruth Prabhu
दक्षिण भारतीय चित्रपट सृष्टीतील अभिनेत्री समांथा रुथ प्रभू तिच्या चित्रपटांद्वारे चाहत्यांचे भरपूर मनोरंजन करताना दिसते. तसेच तिच्या सौंदर्याने अनेक चाहते प्रभावितही होतात. तिच्या फॅन्सची काही कमतरता नाही. ती तर तरूण पिढीच्या हृदयाची धडकन आहे, असे म्हटले जाते. अभिनेत्रीच्या लूकवर आणि तिच्या साधेपणावर चाहते प्रेमाचा वर्षाव करताना दिसतात.
अलिकडेच समांथा ने इन्स्टाग्रामवर ‘Ask me a Question’ हे सेशन ठेवलं होतं. यावेळी तिने चाहत्यांनी विचारलेल्या अनेक प्रश्नांची उत्तरं दिली. यामध्येच तुझ्या चमकदार त्वचेचं रहस्य काय आहे? असा प्रश्न एका चाहत्याने तिला विचारलं. चाहत्याच्या या प्रश्नाला समांथानं खरं काय ते उत्तर देऊन टाकलं. यावर गायत्रीनं उत्तर देत ती म्हणाली, मी फिल्टर वापरलं आहे. कारण, जास्त औषधांमुळे माझी त्वचा फार खराब झालीय. मला स्टिरॉइड शॉट्स घ्यावे लागतील, ज्याचा माझ्या त्वचेवर परिणाम झालाय. माझ्या चेहऱ्यावर खूप पिगमेंटेशन झालं आहे".
सिटाडेल’च्या शूटिंगनंतर समांथाने ब्रेक घेत असल्याचं सांगितलं होतं. गेल्या वर्षी समांथाने तिला मायोसायटिस नावाचा आजार झाल्याचा खुलासा केला होता. यामुळे तब्येतीकडे आणि स्वत:कडे लक्ष देण्यासाठी समांथाने काही काळ कामातून ब्रेक घेण्याचा निर्णय घेतला होता.
दरम्यान, काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित झालेला समांथाचा ‘खुशी’ चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला. या चित्रपटात तिने दाक्षिणात्य अभिनेता विजय देवराकोंडाबरोबर स्क्रीन शेअर केली होती. आता समंथा सिटाडेलच्या हिंदी व्हर्जनमध्ये वरुण धवनसोबत दिसणार आहे. तो ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे. याच्या इंग्रजी व्हर्जनमध्ये प्रियांका चोप्रा मुख्य भूमिकेत दिसणार आहे.