नशिबाने साथ दिली! ऑफिस बॉय, ड्रायव्हर ते सुपरस्टार, 'कांतारा' फेम अभिनेत्याचे असं बदललं आयुष्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2025 16:03 IST2025-10-02T16:01:06+5:302025-10-02T16:03:03+5:30

अभिनेता-दिग्दर्शक ऋषभ शेट्टी((Rishab Shetty) )ला आज कोणत्याही परिचयाची गरज नाही. त्याने २०२२ मध्ये प्रदर्शित झालेल्या 'कांतारा' चित्रपटामधील (Kantara Movie) आपल्या दमदार अभिनयाने सर्वांना थक्क केले. मात्र, दिग्दर्शक-अभिनेता ऋषभ शेट्टीसाठी सुरुवातीचे दिवस सोपे नव्हते.

Fate was on his side! From office boy, driver to superstar, this is how the 'Kantara' fame actor Rishabh Shetty changed his life | नशिबाने साथ दिली! ऑफिस बॉय, ड्रायव्हर ते सुपरस्टार, 'कांतारा' फेम अभिनेत्याचे असं बदललं आयुष्य

नशिबाने साथ दिली! ऑफिस बॉय, ड्रायव्हर ते सुपरस्टार, 'कांतारा' फेम अभिनेत्याचे असं बदललं आयुष्य

अभिनेता-दिग्दर्शक ऋषभ शेट्टी((Rishab Shetty) )ला आज कोणत्याही परिचयाची गरज नाही. त्याने २०२२ मध्ये प्रदर्शित झालेल्या 'कांतारा' चित्रपटामधील (Kantara Movie) आपल्या दमदार अभिनयाने सर्वांना थक्क केले. कन्नड भाषेत बनलेल्या या चित्रपटाने जगभरात सुमारे ४५० कोटींचा व्यवसाय केला, तर भारतात २०० कोटींहून अधिक कमाई केली. मात्र, दिग्दर्शक-अभिनेता ऋषभ शेट्टीसाठी सुरुवातीचे दिवस सोपे नव्हते. 

नुकत्याच झालेल्या मुंबईतील 'कांतारा चॅप्टर १' (Kantara Chapter 1) ट्रेलर लॉन्चदरम्यान, ऋषभ शेट्टी त्या दिवसांची आठवण करून देताना भावुक झाला. जेव्हा तो पहिल्यांदा मुंबईत आला होता आणि आपले स्वप्न पूर्ण करण्याच्या हेतूने धक्के खात होता. काही जागा अशा असतात, जिथे लोक राहत नसले तरी ती जागा मनाच्या जवळ असतात. 'कांतारा' चित्रपटाचे अभिनेते ऋषभ शेट्टीसाठी ती जागा मुंबई आहे. तो म्हणाला, "मुंबई शहर माझ्यासाठी खास आहे. २००८ मध्ये मी अंधेरी येथील एका प्रॉडक्शन हाऊसच्या ऑफिसमध्ये 'ऑफिस बॉय' म्हणून काम करत होतो. यासोबतच मी एका निर्मात्याचा 'ड्रायव्हर'ही होतो. प्रॉडक्शन हाऊसच्या बाहेर रस्त्यावर उभे राहून वडापाव खाताना मी कधी विचारही केला नव्हता की इथेपर्यंत पोहोचू शकेन. १७ वर्षांनंतर सिनेइंडस्ट्रीने मला इथंपर्यंत पोहचवले."

या चित्रपटाने पालटलं ऋषभ शेट्टीचे नशीब
ऋषभ शेट्टीने आपल्या करिअरची सुरुवात २०१२ मध्ये 'तुघलक' चित्रपटातून केली होती. त्यानंतर त्यांनी 'उलिदवरु कंदनते' सारखे चित्रपट केले. या चित्रपटांनी त्याला पैसा मिळवून दिला, पण ती ओळख मिळाली नाही, जी प्रत्येक कलाकाराला हवी असते. २०२२ मध्ये 'कांतारा' मुळे त्याचे नशीब असे पालटले की, त्याचे नाव प्रभास आणि अल्लू अर्जुनसारख्या साऊथ सुपरस्टार्सच्या यादीत जोडले गेले. 

'कांतारा'च्या यशाबद्दल ऋषभ शेट्टी म्हणाला...

'कांतारा'च्या यशाबद्दल बोलताना ऋषभ शेट्टी म्हणाला की, "सिनेमा काय करू शकतो, हे तुम्ही माझ्याकडे पाहून विचार करू शकता. 'कांतारा' चित्रपटाने मला इतकी मोठी ओळख दिली, ज्याचा मी कधी विचारही केला नव्हता." यावेळी ऋषभसोबत त्याची पत्नी प्रगती शेट्टी देखील उपस्थित होती, जिने या चित्रपटाच्या कॉश्चुम  डिपार्टमेंटची जबाबदारी सांभाळली आहे. पुढे ऋषभने सांगितले की, प्रगतीसाठीही ही एक चांगली संधी आहे. लोकांना वाटेल की माझी पत्नी आहे, म्हणून डिझायनर बनली आहे. पण तिने खूप मेहनत घेतली आहे.

Web Title : ऑफिस बॉय से सुपरस्टार: ऋषभ शेट्टी का प्रेरणादायक सफर

Web Summary : 'कांतारा' फेम ऋषभ शेट्टी ने मुंबई में अपने शुरुआती दिनों को याद किया। स्टार बनने से पहले उन्होंने ऑफिस बॉय और ड्राइवर के रूप में काम किया। 'कांतारा' ने उनकी किस्मत बदल दी, और उन्हें दक्षिण सिनेमा के सबसे बड़े सितारों में शामिल कर दिया। उनकी पत्नी, प्रगति शेट्टी ने कॉस्ट्यूम डिजाइनर के रूप में फिल्म की सफलता में योगदान दिया।

Web Title : From Office Boy to Superstar: Rishab Shetty's Inspiring Journey

Web Summary : Rishab Shetty, of 'Kantara' fame, recalls his humble beginnings in Mumbai. He worked as an office boy and driver before achieving stardom. 'Kantara' changed his fortune, placing him among South cinema's biggest stars. His wife, Pragati Shetty, contributed to the film's success as a costume designer.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :TollywoodTollywood