'लकी भास्कर'च्या यशानंतर दुलकर सलमान घेऊन येतोय नवा चित्रपट, टीझर प्रदर्शित

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2025 12:01 IST2025-07-29T12:00:26+5:302025-07-29T12:01:09+5:30

दुलकर सलमाननं आपल्या आगामी पीरियड ड्रामा चित्रपटाचा टीझर प्रदर्शित केला आहे.

Dulquer Salmaan Film Kaantha Official Teaser Unveiled | 'लकी भास्कर'च्या यशानंतर दुलकर सलमान घेऊन येतोय नवा चित्रपट, टीझर प्रदर्शित

'लकी भास्कर'च्या यशानंतर दुलकर सलमान घेऊन येतोय नवा चित्रपट, टीझर प्रदर्शित

Dulquer Salmaan Film: दुलकर सलमान केवळ दक्षिणेतच नाही तर बॉलिवूडमध्येही लोकप्रिय आहे. हिंदी चित्रपटसृष्टीतही या अभिनेत्याचे चाहता वर्ग खूप मोठा आहे. दक्षिण सिनेमातील आपल्या रोमँटिक भूमिकांसाठी ओळखल्या जाणार्‍या, दुलकर सलमान याने आतापर्यंत अनेक हीट चित्रपट दिले आहेत. 'लकी भास्कर' चित्रपटातही या अभिनेत्याने दमदार अभिनय केला आहे. आता 'लकी भास्कर'सारख्या यशस्वी चित्रपटानंतर अभिनेता दुलकर सलमान पुन्हा एकदा एका वेगळ्या आणि प्रभावी भूमिकेत प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. आपल्या नव्या चित्रपटाची झलक अभिनेत्यानं चाहत्यांसोबत शेअर केली आहे.

काल दुलकर सलमानचा वाढदिवस होता. यानिमित्तानं त्यानं चाहत्यांना खास भेट दिली. अभिनेत्यानं आपल्या आगामी पीरियड ड्रामा असलेला 'कांथा' चित्रपटाचा टीझर प्रदर्शित केला आहे. 'कांथा' चित्रपटाची कथा १९५० च्या दशकातील आहे. सिनेसृष्टीतील अहंकार, मैत्री, प्रेम आणि सर्जनशील स्वातंत्र्याच्या संघर्षावर आधारित ही कथा एक अनुभवी दिग्दर्शक 'अय्या' आणि एक उगवता सुपरस्टार 'चंद्रन' या दोन महत्वाच्या व्यक्तिरेखांभोवती फिरते. या चित्रपटात दुलकर सलमानने 'चंद्रन' ही महत्वाची भूमिका साकारली आहे. तर समुथिरकानी यांनी 'अय्या' या व्यक्तिरेखेतून एक प्रभावी दिग्दर्शकची भूमिका ताकदीने उभी केली आहे.

दुलकर सलमानची 'वेल्फेअर फिल्म्स' आणि राणा दग्गुबातीची 'स्पिरिट मीडिया' यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. चित्रपटात राणा दग्गुबाती, समुथिरकानी आणि भाग्यश्री बोरसे यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.  
हा चित्रपट १२ सप्टेंबर २०२५ रोजी प्रदर्शित होणार आहे.

दुलकर सलमान हा मल्याळी सुपरस्टार मामूट्टी यांचा तो मुलगा आहे.  मोस्ट हॅन्डसम हिरो असूनही दुलकर सलमान अगदी फॅमिली मॅन आहे. दुलकरने चित्रपटात येण्यापूर्वीच लग्न केले होते. २२ डिसेंबर २०११ रोजी त्याने चेन्नईतील आर्किटेक्ट अमल सोफियासोबत लग्न केले होते. आज ते एका क्युट मुलीचे पालक आहेत. हे दोघांही सर्वांना कपल गोल्स देताना दिसतात.
 

Web Title: Dulquer Salmaan Film Kaantha Official Teaser Unveiled

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.