सेटवर नायिकेचा रहस्यमयी मृत्यू अन्...; २ तास २८ मिनिटांचा थरारक सिनेमा, 'हा' मर्डर मिस्ट्री पाहून डोकं चक्रावेल
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2026 14:00 IST2026-01-01T13:58:08+5:302026-01-01T14:00:12+5:30
हल्ली सिनेमागृह असो किंवा ओटीटी माध्यम दाक्षिणात्य चित्रपटांची क्रेझ सध्या सर्वत्र पाहायला मिळत आहे. असाच एक चित्रपट ओटीटीवर ट्रेंडिंग आहे.

सेटवर नायिकेचा रहस्यमयी मृत्यू अन्...; २ तास २८ मिनिटांचा थरारक सिनेमा, 'हा' मर्डर मिस्ट्री पाहून डोकं चक्रावेल
OTT Cinema: डिसेंबर महिना मनोरंजनाच्या दृष्टीने धमाकेदार ठरला आहे.वर्षाच्या शेवटच्या महिन्यात ओटीटीवर विविध कथानक असलेले अनेक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आले. २०२५ मध्ये अॅक्शन रोमान्स आणि थ्रिलर ते सस्पेन्स अशा विविध धाटणीचे चित्रपटांची ओटीटी प्रेमींमध्ये भयंकर क्रेझ पाहायला मिळाली. अशाच एका चित्रपटाची नेटफ्लिक्सवर चर्चा आहे. हा चित्रपटाला प्रेक्षकांचा भरभरुन प्रतिसाद मिळतो आहे.
हल्ली सिनेमागृह असो किंवा ओटीटी माध्यम दाक्षिणात्य चित्रपटांची क्रेझ सध्या सर्वत्र पाहायला मिळत आहे. २०२५ मध्ये असे अनेक चित्रपट, वेब सीरिज प्रदर्शित झाल्या, ज्यांनी प्रेक्षकांना बांधून ठेवलं.असाच एक तमिळ चित्रपटाचा ओटीटीवर दबदबा पाहायला मिळतोय. या मर्डर मिस्ट्री चित्रपटाचं नाव कांथा आहे. हा चित्रपट १४ नोव्हेंबर २०२५ रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला.या चित्रपटात दुलकर सलमानने मुख्य भूमिका साकारली आहे, तर राणा दग्गुबत्ती, भाग्यश्री बोरसे देखील आहे. तुम्ही हा चित्रपट हिंदी आणि तमिळ व्यतिरिक्त तेलुगू, कन्नड आणि मल्याळम भाषांमध्येही पाहू शकता.आयएमडीवर या चित्रपटाला
कथानक
कांथा या चित्रपटात १९५० च्या काळातील कथा दाखवण्यात आली आहे. हा चित्रपट सिनेविश्वावर आधारित आहे. यामध्ये दुलकर सलमान साकारत असलेल्या भूमिकेचं नाव महादेवन आहे. तस भाग्यश्री बोरसेने कुमारी नावाची व्यक्तिरेखा साकारली आहे.बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाला फारसं यश मिळालं नसलं तरी आता ओटीटवर या चित्रपटाने चांगलीच क्रेझ निर्माण केली आहे.या कथेच्या केंद्रस्थानी एक लोकप्रिय अभिनेता आणि एक प्रसिद्ध दिग्दर्शक आहेत. चित्रपटात दाखवण्यात आलंय की, अय्या नावाचा व्यक्ती महादेवनला अनाथ आश्रमातून दत्तक घेतो. त्याला अभिनयाचं प्रशिक्षण देतो.मात्र, अय्याला महादेवनने त्याच्या सांगण्यावरून चित्रपट करावेत, असं वाटत असतं. पण, महादेवनला हे काही मान्य नसतं. त्याच्यातील हा वाद टोकाला जातो आणि अय्या महादेवनला खोट्या केसमध्ये अडकवतो.
त्यानंतर महादेवन मोठा स्टार होऊन परततो. अखेरीस तो दिग्दर्शक अय्याच्या एका ड्रीम प्रोजेक्टवर काम करतो. त्यांच्यातील कटूता दूर होते. दरम्यान, अय़्या यावेळी मोठी खेळी करतो आणि महादेवनसमोर त्याची शिष्य असलेल्या कुमारीला आणतो. खऱ्या आयु्ष्यात विवाहित असलेल्या महादेवनचा कुमारीवर जीव जडतो. मात्र, चित्रपटाच्या शेवटच्या क्षणीच तिचा मृत्यू होतो. त्यानंतर कथेला एक नवीन वळण येतं आणि तपासाची जबाबदारी अशा पोलीस अधिकाऱ्याकडे सोपवली जाते, जो प्रत्येक तपशिलाची बारकाईने तपासणी करण्यात हुशार असतो. या मर्डर मिस्ट्रीमध्ये अनेक ट्वि्स्ट आणि टर्न्स आहेत जे प्रेक्षकांना खिळवून ठेवतात. आयएमडीवर या चित्रपटाला ७.७ रेटिंग मिळाले आहेत.