मोहनलाल यांच्या 'दृश्यम ३'च्या रिलीज डेटची घोषणा; 'या' दिवशी चित्रपटगृहात येणार, फक्त काही दिवस बाकी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2026 18:03 IST2026-02-24T15:46:16+5:302026-02-24T18:03:38+5:30

'दृश्यम ३' चित्रपटाचं पोस्टर शेअर करत ही घोषणा करण्यात आली आहे.

Drishyam 3 Release Date 2 April 2026 Mohanlal Jeethu Joseph | मोहनलाल यांच्या 'दृश्यम ३'च्या रिलीज डेटची घोषणा; 'या' दिवशी चित्रपटगृहात येणार, फक्त काही दिवस बाकी!

मोहनलाल यांच्या 'दृश्यम ३'च्या रिलीज डेटची घोषणा; 'या' दिवशी चित्रपटगृहात येणार, फक्त काही दिवस बाकी!

'दृश्यम' हा चित्रपट प्रत्येक भाषेत सुपरहिट ठरला आहे. जीतू जोसेफच्या मूळ मल्याळम चित्रपटात साऊथ सुपरस्टार मोहनलाल यांची मुख्य भूमिका आहे. 'दृश्यम'चा तिसरा भाग लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाविषयी प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. आता या चित्रपटाची रिलीज डेट समोर आली आहे.

मोहनलाल यांचा 'दृश्यम ३' हा २ एप्रिल २०२६ रोजी प्रदर्शित होणार आहे.  चित्रपटाचं पोस्टर शेअर करत ही घोषणा करण्यात आली आहे. अजय देवगणच्या 'दृश्यम ३' आधी मोहनलाल यांचा 'दृश्यम ३' प्रेक्षकांच्या भेटीला येतोय.  अजय देवगणचा 'दृश्यम ३' हा २ ऑक्टोबर २०२६ रोजी रिलीज होणार आहे. 'दृश्यम ३' मल्याळम आणि हिंदी दोन्हीमध्ये एकाच दिवशी रिलीज होईल अशी चर्चा होती. मात्र आता तसं होणार नाही. 'दृश्यम २'ची गोष्ट जिथे संपली होती तिथूनच 'दृश्यम ३'ची कहाणी सुरु होणार आहे. 


 'दृश्यम 3'ची स्टोरी काय? 

मोहनलाल स्टारर मल्याळम फिल्मचे दिग्दर्शक जीतू जोसेफ क्राइम थ्रिलर ड्रामाचे मास्टरमाइंड आहेत. जीतू जोसेफ यांनी इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या मुलाखतीत 'दृश्यम ३'च्या कथानकाबाबत मोठी हिंट दिली होती. जीतू जोसेफ म्हणाले की, "'दृश्यम ३'च्या घोषणेनंतर अनेकांनी मला सांगितलं की'दृश्यम २'ची स्क्रिप्ट खूप कमाल होती आणि आता 'दृश्यम ३'कडून अपेक्षा वाढल्या आहेत. पण माझा फोकस सध्या जॉर्जकुट्टी आणि त्याच्या कुटुंबियांवर आहे. 'दृश्यम २' हा चित्रपट पहिल्या 'दृश्यम'पेक्षा वेगळा होता. त्याप्रमाणेच 'दृश्यम ३' हा चित्रपट 'पार्ट २'पेक्षा वेगळा असेल".
 

Web Title : मोहनलाल की 'दृश्यम 3' की रिलीज डेट घोषित; जल्द ही सिनेमाघरों में!

Web Summary : मोहनलाल की 'दृश्यम 3', अजय देवगन की फिल्म से पहले 2 अप्रैल, 2026 को रिलीज होगी। कहानी 'दृश्यम 2' के अंत से आगे बढ़ती है। निर्देशक जीतू जोसेफ ने 'दृश्यम 3' को अनूठा बताया।

Web Title : Mohanlal's 'Drishyam 3' Release Date Announced; Coming Soon to Theaters!

Web Summary : Mohanlal's 'Drishyam 3' releases April 2, 2026, before Ajay Devgn's. The story picks up where 'Drishyam 2' ended. Director Jeethu Joseph hints 'Drishyam 3' will be unique.