"माझा देवावर विश्वास नाही...", प्रसिद्ध दिग्दर्शक एस.एस.राजामौली यांच्या वक्तव्याने मोठा वाद, तक्रार दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2025 08:40 IST2025-11-19T08:38:37+5:302025-11-19T08:40:25+5:30
भगवान हनुमानबाबत केलेलं 'ते' वक्तव्य भोवलं! प्रसिद्ध दिग्दर्शक एस.एस.राजमौली यांच्या अडचणीत वाढ

"माझा देवावर विश्वास नाही...", प्रसिद्ध दिग्दर्शक एस.एस.राजामौली यांच्या वक्तव्याने मोठा वाद, तक्रार दाखल
SS Rajamouli: 'आरआरआर' आणि 'बाहुबली' यांसारख्या सुपरहिट चित्रपटांचं दिग्दर्शन करणारे एस.एस.राजामौली हे दाक्षिणात्य सिनेइंडस्ट्रीतील एक नावाजलेलं व्यक्तिमत्व आहे. त्यांनी आजवर अनेक ब्लॉकबस्टर सिनेमांचं दिग्दर्शन केलं आहे. अनेकांना त्यांच्याबरोबर काम करायचं आहे. सध्या एस.एस. राजामौली त्यांचा आगामी चित्रपट 'वाराणसी'मुळे चर्चेत आले आहेत. अलिकडेच १५ नोव्हेंबरला या चित्रपटाचा लॉन्चिंग इव्हेंट भव्य पद्धतीने पार पडला. या इव्हेंटला दिग्दर्शक एस.एस. राजामौली यांसह सिनेमाची संपूर्ण स्टारकास्टही उपस्थित होती.मात्र, या दरम्यान, राजामौली यांनी केलेल्या एका वक्तव्यामुळे मोठा वाद निर्माण झाला आहे. या इ्व्हेंटवेळी त्यांनी केलेल्या विधानाची सध्या सर्वत्र चर्चा होत आहे.
महेश बाबू, प्रियांका चोप्रा जोनास आणि पृथ्वीराज सुकुमारन यांच्या मुख्य भूमिका असलेल्या या वाराणसी चित्रपटाचा पहिला टीझर १५ नोव्हेंबर रोजी या कार्यक्रमात प्रदर्शित झाला.यादरम्यान राजामौली यांनी असं काही बोलले ज्यामुळे लोकांना धक्का बसला आणि त्यांनी दिग्दर्शकावर जोरदार टीका करण्यास सुरुवात केली.त्यांच्या या वक्तव्यामुळे राजमौली यांच्याविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला आहे. हिंदू धर्मीयांच्या भावना दुखावल्याचा आरोपही त्यांच्यावर करण्यात आलाय.
राजामौली यांनी भर कार्यक्रमात भगवान हनुमानाबाबत केलेल्या टिप्पणीमुळे ते अनेकांच्या निशाण्यावर आले आहेत. त्यांच्या त्या वक्तव्याचा सर्व स्तरातून निषेध करण्यात येत असून याला बजरंगबली आणि हिंदू धर्माच्या श्रद्धेचा अपमान म्हटले आहे.काल मंगळवारी, वानर सेना संघटनेने सरूरनगर पोलीस ठाण्यात त्यांच्याविरोधात तक्रार दाखल केली. पोलिसांच्या म्हणण्यानुसार,त्यांच्यावर अद्याप गुन्हा दाखल झालेला नाही,मात्र,चौकशी सुरू आहे.
राजामौली काय म्हणाले?
"हा क्षण माझ्यासाठी खूप भावनिक आहे. मी स्वतः देवाला मानत नाही,माझा देवावर विश्वास नाही. मी नास्तिक आहे. पण माझे वडील नेहमी म्हणतात की, हनुमानजी सर्व काही सांभाळून घेतील. पण, ते अशा प्रकारे सांभाळून घेतात का? हा विचार करून मला खूप राग येत आहे. जेव्हा माझ्या वडिलांनी हनुमानाचा आशीर्वाद घेण्याबद्दल आणि त्यांच्यावर अवलंबून राहण्याबद्दल सांगितले, तेव्हा मला खूप राग आला."