समांथानं EX पतीची ती शेवटची आठवणही मिटवली, नागा चैतन्यसोबत आता काहीच उरलं नाही!
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 8, 2025 13:06 IST2025-06-08T12:50:01+5:302025-06-08T13:06:42+5:30
समांथानं आपल्या एक्स पतीच्या सर्व आठवणी हळूहळू पुसून टाकल्या आहेत.

समांथानं EX पतीची ती शेवटची आठवणही मिटवली, नागा चैतन्यसोबत आता काहीच उरलं नाही!
दक्षिणेतील प्रसिद्ध अभिनेत्री समांथा रूथ प्रभू (Samantha Ruth Prabhu) सध्या तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. 'ये माया चेसावे' या तिच्या पहिल्या तेलुगू चित्रपटाच्या आठवणी जपत तिने पाठीवर 'YMC' हा टॅटू काढून घेतला होता. मात्र, अलीकडेच सोशल मीडियावर शेअर केलेल्या एका व्हिडीओमध्ये तिचा हा टॅटू गायब झाल्याचं दिसून आलं. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.
समांथानं शेअर केलेला व्हिडीओ हा एक जाहिरातीचा आहे. या व्हिडीओमध्ये दिसतंय की, समांथानं एक ड्रेस परिधान केला असून तिच्या पाठीवर कुठेही 'YMC' टॅटू दिसत नाही. व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहलंय, "लपवण्यासारखं काहीच नाही". यामुळे चाहत्यांच्या चर्चेला उधाण आलं आहे. काही युजर्सनी कयास लावला की तिने टॅटू हटवला आहे, तर काहींनी म्हटलं की ती मेकअपने तो लपवला असेल.
या टॅटूचं तिचा माजी पती नागा चैतन्य (Naga Chaitanya) याच्याशी खोल संबंध होता. कारण, 'ये माया चेसावे' (२०१०) या चित्रपटादरम्यान त्यांच्या प्रेमकथेची सुरुवात झालीहोती. पुढे त्यांनी २०१७ मध्ये गोव्यात विवाह केला. मात्र, २०२१ मध्ये दोघांचा घटस्फोट झाला.
दरम्यान, समंथाचं नाव आता 'Citadel: Honey Bunny' या वेबसीरिजचे दिग्दर्शक राज निदिमोरू यांच्यासोबत जोडलं जात आहे. रिपोर्ट्सनुसार, दोघं अनेकदा एकत्र दिसतात आणि समांथाने अनेकदा इंस्टाग्रामवर राजसोबतचे फोटोही शेअर केले आहेत. त्यामुळे हे नातं केवळ व्यावसायिक नसून खासगीही असल्याचे संकेत मिळत आहेत.