"आम्ही ६-७ तास कचऱ्याच्या ढिगाऱ्यात होतो अन्....", धनुषने रश्मिकाबाबत केला अजब खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2025 09:19 IST2025-06-11T09:17:52+5:302025-06-11T09:19:09+5:30

'कुबेरा'च्या शूटवेळी काय घडलं?

dhanush and rashmika mandanna shot in dumpyard for 7 hours while filming movie kuberaa | "आम्ही ६-७ तास कचऱ्याच्या ढिगाऱ्यात होतो अन्....", धनुषने रश्मिकाबाबत केला अजब खुलासा

"आम्ही ६-७ तास कचऱ्याच्या ढिगाऱ्यात होतो अन्....", धनुषने रश्मिकाबाबत केला अजब खुलासा

धनुष (Dhanush) आणि रश्मिका मंदानाचा (Rashmika Mandanna) 'कुबेरा' सिनेमा प्रदर्शित होणार आहे. शेखर कमुला दिग्दर्शित सिनेमात नागार्जुनही आहे. नुकतंच सिनेमासंबंधित इव्हेंट पार पडला. यावेळी धनुष आणि रश्मिकाने शूटिंगचे किस्से सांगितले. शूटिंगवेळी एका सीनसाठी दोघंही ६ ते ७ तास कचऱ्याच्या डब्यात होते असा खुलासा धनुषने केला. तसंच त्याने रश्मिकाबद्दलही अजब दावा केला. काय म्हणाला धनुष?

'कुबेरा' सिनेमातील 'पिप्पी पिप्पी दम दम' हे गाणं नुकतंच लाँच करण्यात आलं. या लाँचिंग इव्हेंटमध्ये धनुषने शूटवेळी घडलेला किस्सा सांगितला. कचऱ्याच्या ढिगाऱ्यात शूट झालेल्या सीनविषयी तो बोलला. तो म्हणाला, "मी आणि रश्मिका ६ ते ७ तास कचऱ्याच्या ढिगाऱ्यात होतो. पण रश्मिका एकदम ठीक  होती. तिला कसलाच दुर्गंध येत नव्हता. आम्ही मास्क लावून शूट केलं अशा बातम्या मी वाचल्या. हे खरं नाहीए. पण विना मास्क कचऱ्याच्या ढिगाऱ्यात शूट करणं काही मोठी गोष्ट नव्हती. काही अडचण आली नाही."

तो पुढे म्हणाला, "जेव्हा तुम्ही कंफर्ट झोन असता तेव्हा तुम्हाला सोयीचं वाटेल तेच करता. सुरक्षित राहता. मात्र आपण कंफर्टेबल नसलेल्या गोष्टी करणं खूप काही शिकवून जातात. अशा प्रकारे काम करणं एक वेगळाच अनुभव असतो."

'कुबेरा' २० जून रोजी रिलीज होत आहे. सिनेमात धनुष, नागार्जुन आणि रश्मिका अशी तिकडी पाहायला मिळणार आहे. तिघांचेही चाहते सिनेमा पाहण्यासाठी आतुर आहेत.

Web Title: dhanush and rashmika mandanna shot in dumpyard for 7 hours while filming movie kuberaa