भुताटकीचा जबरदस्त थरार अन् खिळवून ठेवणारे सीन्स! २ तास ५ मिनिटांचा 'हा' सिनेमा पाहून उडेल थरकाप
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 13, 2025 16:14 IST2025-10-13T16:09:10+5:302025-10-13T16:14:06+5:30
भयानक ट्विस्ट अन् गुढ कथा ...; २ तास ५ मिनिटांचा 'हा' सिनेमा पाहताना जागेवरून हलनार नाही

भुताटकीचा जबरदस्त थरार अन् खिळवून ठेवणारे सीन्स! २ तास ५ मिनिटांचा 'हा' सिनेमा पाहून उडेल थरकाप
South Movies: यंदाचं हे वर्ष हे हॉरर चित्रपट प्रेमींसाठी एक पर्वणीच ठरलं आहे. ओटीटीमुळे आता बराचसा प्रेक्षकवर्ग या जॉनरच्या चित्रपटांकडे वळला आहे. याचदरम्यान, एक नवीन भयपटाची ओटीटीप्रेमींमध्ये चर्चा रंगली आहे. लवकरच हा सिनेमा आता लोकांना घरबसल्या देखील पाहता येणार आहे. या बहुचर्चित हॉरर चित्रपटांचं नाव 'किष्किंधापुरी' आहे.
सध्याच्या घडीला हिंदी असो किंवा दाक्षिणात्य सिनेमा,सगळीकडे हॉरर चित्रपटांची क्रेझ आहे. अशातच अलिकडेच १२ सप्टेंबरला प्रदर्शित झालेल्या'किष्किंधापुरी' चित्रपटाबद्दल प्रेक्षकांना उत्सुकता आहे. या चित्रपटाची कथा त्यातील पात्रांच्या अभिनयाचं समीक्षकांसह चाहत्यांकडूनही भरभरुन कौतुक होतंय. हा चित्रपट एकदा पाहायला सुरुवात केलीत तर तुम्ही २ तास जागण्यावरुन हलणार नाही. किष्किंधापुरी चित्रपटाचं कथानक राघव आणि त्याची मैत्रीण मैथिलीवर आधारित आहे. जे एका ट्रॅव्हल कंपनीत काम करत असतात. त्याचवेळी ते पर्यटकांना झपाटलेल्या ठिकाणी घेऊन जातात. मग कथानकाला पूर्णपणे नवं वळणं येतं. त्यादरम्यान येणारे ट्विस्ट प्रेक्षकांना खिळवून ठेवतात. शिवाय भटपटातील ते सीन्स पाहून अंगावर काटा आल्यावाचून राहणार नाही. किष्किंदापुरी गावात सुवर्ण माया नावाचं एक रेडिओ स्टेशन आहे, जिथे काही वर्षांपूर्वी खून झालेला असतो.
किष्किंधपुरीमध्ये बेल्लमकोंडा साई श्रीनिवास आणि अनुपमा परमेश्वरन यांच्या प्रमुख भूमिका आहेत. तसंच सँडी मास्टर, तनिकेला भरणी, हायपर आडी, श्रीकांत अय्यंगार, मकरंद देशपांडे, प्रेमा आणि इतर अनेक कलाकार देखील महत्त्वपूर्ण भूमिका साकारतात. येत्या १७ ऑक्टोबरला हा चित्रपट झी ५ वर रिलीज होईल.