'बजरंगबलीला श्रीरामांची साथ', रामनवमीच्या मुहूर्तावर 'जय हनुमान' सिनेमाची शानदार घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2024 12:50 IST2024-04-17T12:50:23+5:302024-04-17T12:50:53+5:30

सुपरहिट हनुमान सिनेमाचा पुढचा भाग अर्थात जय हनुमानची घोषणा करण्यात आलीय. सिनेमाचं अनोखं पोस्टर सर्वांच्या पसंतीस उतरलं आहे (jai hanuman, hanuman)

announcement of the next part of the famous movie Hanuman jai hanuman on ram navami | 'बजरंगबलीला श्रीरामांची साथ', रामनवमीच्या मुहूर्तावर 'जय हनुमान' सिनेमाची शानदार घोषणा

'बजरंगबलीला श्रीरामांची साथ', रामनवमीच्या मुहूर्तावर 'जय हनुमान' सिनेमाची शानदार घोषणा

२०२४ ला आलेल्या 'हनुमान' सिनेमाने अनपेक्षितरित्या प्रेक्षकांचं प्रेम मिळवलं. दक्षिणेतला हा सिनेमा त्याच्या अनोख्या कथेमुळे भारतभर गाजला. सिनेमाने बॉक्स ऑफीसवर सुद्धा चांगली कमाई केली. 'हनुमान'नंतर लगेचच या सिनेमाच्या पुढच्या भागाची म्हणजेच 'जय हनुमान' सिनेमाची घोषणा करण्यात आली. आज रामनवमीच्या मुहुर्तावर 'जय हनुमान'चं पोस्टर रिलीज झालं असून सिनेमाची अधिकृत घोषणा करण्यात आलीय.

'वचनं धर्मस्य रक्षणं' असं कॅप्शन असलेलं हे पोस्टर आज रामनवमीच्या मुहूर्तावर रिलीज करण्यात आलंय. 'हनुमान'चा दिग्दर्शक प्रसंत वर्मा यांनी हे पोस्टर रिलीज केलंय. "त्रेतायुगात एक पवित्र वचन मी तुम्हाला दिलं होतं. त्या वचनाचं पालन आणि संरक्षण कलियुगात केलं जाईल", असं कॅप्शन या पोस्टरला देण्यात आलं आहे. पोस्टरमध्ये पाहायला मिळतं बजरंगबलीला श्रीरामांची साथ मिळाली असून दोघांचा हात एकमेकांच्या हातात आहे.

'हनुमान'च्या सुपरहिट यशानंतर प्रसंत वर्मा 'जय हनुमान' या सिनेमाचा सिक्वेल प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येत आहेत. पुढच्या भागात पुन्हा एकदा अभिनेता तेजा सज्जा प्रमुख भूमिकेत झळकणार आहे. सिनेमाच्या टीमने सर्वांना रामनवमीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. 'जय हनुमान'ची रिलीज डेट अजून समोर आली नाहीय. पण हा सिनेमा पुढील वर्षी प्रेक्षकांच्या भेटीला येण्याची शक्यता आहे.

Web Title: announcement of the next part of the famous movie Hanuman jai hanuman on ram navami