गळ्यात मंगळसूत्र, भांगेत कुंकू अन्...; 'पुष्पा २' मधील श्रीवल्लीचा पहिला लूक समोर

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2024 11:45 IST2024-04-05T11:44:45+5:302024-04-05T11:45:51+5:30

Pushpa 2 : रश्मिकाच्या वाढदिवशी चाहत्यांना खास सरप्राइज, 'पुष्पा २' मधील श्रीवल्लीच्या पहिल्या लूकचं पोस्ट प्रदर्शित

allu arjun pushpa 2 rashmika mandanna aka srivalli first look out on actress birthday | गळ्यात मंगळसूत्र, भांगेत कुंकू अन्...; 'पुष्पा २' मधील श्रीवल्लीचा पहिला लूक समोर

गळ्यात मंगळसूत्र, भांगेत कुंकू अन्...; 'पुष्पा २' मधील श्रीवल्लीचा पहिला लूक समोर

२०२१ साली प्रदर्शित झालेल्या 'पुष्पा : द राइज' या सिनेमाने प्रेक्षकांना अक्षरश: वेडं करून सोडलं. अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदाना मुख्य भूमिकेत असलेल्या या सिनेमाची क्रेझ आजही कायम आहे. या सिनेमातील गाणी आणि डायलॉग्सही प्रचंड व्हायरल झाले होते. 'पुष्पा' नंतर आता चाहते या सिनेमाच्या सीक्वलच्या प्रतिक्षेत आहेत. 'पुष्पा २'चं शूटिंग जोरदार सुरू असून लवकरच हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. काही दिवसांपूर्वीच अल्लू अर्जुनच्या वाढदिवशी पुष्पा २ सिनेमाचं दुसरं पोस्टर प्रदर्शित करण्यात आलं होतं. आता या सिनेमातील श्रीवल्लीचा पहिला लूक समोर आला आहे. 

'पुष्पा' सिनेमात श्रीवल्लीची भूमिका साकारून अभिनेत्री रश्मिका मंदाना प्रसिद्धीझोतात आली. या भूमिकेने तिला लोकप्रियतेच्या शिखरावर नेऊन ठेवलं. सिनेमा रिलीज झाल्यानंतर अवघ्या काही दिवसांतच रश्मिका नॅशनल क्रश झाली होती. आज रश्मिकाचा वाढदिवस आहे. रश्मिकाने वाढदिवशी चाहत्यांना गोड सरप्राइज दिलं आहे. 'पुष्पा २'मध्ये रश्मिका साकारत असलेल्या श्रीवल्लीचा पहिला लूक प्रदर्शित करण्यात आला आहे. 

रश्मिकाने हिरव्या रंगाची भरजरी साडी नेसून साज केल्याचं पाहायला मिळत आहे. हातात बांगड्या आणि गळ्यात दागिने घालत तिने पारंपरिक साज केला आहे. तिच्या गळ्यात मंगळसूत्र आणि केसांत सिंदूरही दिसत आहे. 'पुष्पा २'मधील श्रीवल्लीचा हा लूक पाहून चाहते थक्क झाले आहेत. 

दरम्यान, 'पुष्पा २ : द रुल' सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. १५ ऑगस्टला स्वातंत्र्यदिनाच्या मुहुर्तावर हा सिनेमा सर्वत्र प्रदर्शित करण्यात येणार आहे. 'पुष्पा २'च्या सेटवरील काही फोटोही व्हायरल झाले होते. त्यामुळे या सिनेमाबाबत चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. 
 

Web Title: allu arjun pushpa 2 rashmika mandanna aka srivalli first look out on actress birthday