कन्फर्म! खास दिवशी येतोय 'पुष्पा 2' चा टीझर, अल्लू अर्जुनने पोस्टर शेअर करत दिली गुडन्यूज

By ऑनलाइन लोकमत | Published: April 2, 2024 04:26 PM2024-04-02T16:26:44+5:302024-04-02T16:28:24+5:30

'पुष्पा 2' साठी तयार व्हा! या दिवशी येतोय टीझर

Allu Arjun Pusha The Rule teaser coming in 6 days shared new poster from the movie | कन्फर्म! खास दिवशी येतोय 'पुष्पा 2' चा टीझर, अल्लू अर्जुनने पोस्टर शेअर करत दिली गुडन्यूज

कन्फर्म! खास दिवशी येतोय 'पुष्पा 2' चा टीझर, अल्लू अर्जुनने पोस्टर शेअर करत दिली गुडन्यूज

अल्लू अर्जुनच्या (Allu Arjun) आगामी 'पुष्पा 2'ची (Pushpa: The Rule) चाहते उत्सुकतेने वाट पाहत आहेत. 'पुष्पा फ्लावर नही फायर है मे' हा त्याचा डायलॉग प्रचंड गाजला. तसंच सिनेमातील गाणी, अल्लू अर्जुनची स्टाईल, रश्मिकासोबतची केमिस्ट्री, अॅक्शन सीन्स सगळंच प्रेक्षकांच्या पसंतीस पडलं. आता पुष्पा 2 साठी तयार राहा, कारण लवकरच सिनेमाचा टीझर तुमच्या भेटीला येणार आहे.

अल्लू अर्जुनने इन्स्टाग्रामवर स्टोरी शेअर केली आहे. यामध्ये पायात घुंगरु असलेला फोटो आहे. तर अवतीभवती गुलाल उधळण्यात आलाय. याआधी सिनेमाचे काही पोस्टर आणि अल्लू फर्स्ट लूक रिलीज झाला होता. तसंच 'पुष्पा 2' मधील अल्लू अर्जुनचा लूकही चाहत्यांसमोर आला होता. आता मेकर्सने टीझर कधी येणार हे जाहीर केलं आहे. अल्लू अर्जुनचा वाढदिवस 8 एप्रिल रोजी असतो. याच खास दिवशी मेकर्सने टीझर रिलीज करण्याचं ठरवलं आहे. त्यामुळे चाहत्यांना आता टीझरसाठी काही दिवसच वाट पाहावी लागणार आहे.


'पुष्पा:द राइज' या २०२१ मध्ये आलेल्या सिनेमाने धुमाकूळ घातला होता. आता तीन वर्षांनी दुसरा भाग 'पुष्पा : द रुल'ही प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. अल्लू अर्जुनने 'पुष्पा'मधील भूमिकेसाठी राष्ट्रीय पुरस्कारही पटकावला. अल्लू अर्जुनला पुन्हा पुष्पाच्या भूमिकेत पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.  सिनेमा १५ ऑगस्टला रिलीज होणार आहे. सुकुमार यांनी सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे. 

कॅमिओ रोलसाठी ही नावं चर्चेत
पुष्पा हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर ब्लॉकबस्टर ठरला. कोरोनाच्या काळात सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांपैकी हा एक होता. पुष्पा २ बद्दल सांगायचे तर, समांथा रुथ प्रभू देखील चित्रपटात छोट्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटात संजय दत्तचीही खास भूमिका असण्याची शक्यता आहे. हा चित्रपट १५ ऑगस्ट २०२४ रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.

Web Title: Allu Arjun Pusha The Rule teaser coming in 6 days shared new poster from the movie

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.