'छावा'मधील औरंगजेबानंतर अक्षय खन्नाचा 'शुक्राचार्य' अवतार, 'या' सिनेमात झळकणार!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2025 12:36 IST2025-09-30T12:35:22+5:302025-09-30T12:36:58+5:30

अक्षय खन्ना आता 'शुक्राचार्य'च्या भूमिकेत; अंगावर काटा आणणारा फर्स्ट लूक प्रदर्शित

Akshaye Khanna First Look Out As Asuraguru Shukracharya In Prasanth Varma Movie Mahakali After Aurangzeb In Chhaava Movie | 'छावा'मधील औरंगजेबानंतर अक्षय खन्नाचा 'शुक्राचार्य' अवतार, 'या' सिनेमात झळकणार!

'छावा'मधील औरंगजेबानंतर अक्षय खन्नाचा 'शुक्राचार्य' अवतार, 'या' सिनेमात झळकणार!

Akshaye Khanna First Look Out As Asuraguru Shukracharya: बॉलिवूड अभिनेता अक्षय खन्ना लवकरच एका दमदार भूमिकेतून दक्षिण भारतीय चित्रपटसृष्टीत पदार्पण करत आहे. प्रशांत वर्मा दिग्दर्शित महिला सुपरहिरो चित्रपट 'महाकाली' मध्ये तो एका विशेष भूमिकेत दिसणार आहे, ज्याचा फर्स्ट लूक नुकताच प्रेक्षकांसमोर आला आहे. स्मितहास्य आणि गालावरील खळीसाठी प्रसिद्ध असणारा अक्षय खन्ना या चित्रपटात 'असुरगुरु शुक्राचार्य' या ऋषींच्या भूमिकेत दिसणार आहे. 'महाकाली' चित्रपटाचे हे नवे पोस्टर सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, ज्यात अभिनेत्याला ओळखणेही कठीण झाले आहे.

प्रशांत वर्मा यांनी त्यांच्या आगामी चित्रपट 'महाकाली'मधील अक्षय खन्नाचा हा पहिला लूक रिलीज केला आहे. शुक्राचार्य यांच्या भूमिकेत अक्षय खन्नाचा लूक अप्रतिम आहे. पांढरे कपडे, लांब पांढरे केस आणि कपाळावर टिळक लावलेला अक्षय खन्नाचा हा लूक जबरदस्त दिसतोय. 'छावा' चित्रपटात औरंगजेबाची भूमिका साकारल्यानंतर आता अक्षय खन्नाचा हा 'शुक्राचार्य' अवतार प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण करत आहे. 


See Mahakali Poster Here

'हनुमान' चित्रपटाचे दिग्दर्शक प्रशांत वर्मा त्यांच्या नवीन 'महाकाली' चित्रपटाद्वारे बॉक्स ऑफिस गाजवण्यासाठी आणि प्रेक्षकांची मने जिंकण्यासाठी सज्ज झाले आहेत. सध्या 'महाकाली'मधील केवळ अक्षय खन्नाचा फर्स्ट लूक जाहीर करण्यात आला आहे. चित्रपटाच्या इतर कलाकारांबद्दल किंवा तो कधी प्रदर्शित होणार याबद्दल मात्र त्यांनी कोणतीही माहिती शेअर केलेली नाही.

Web Title : औरंगजेब के बाद अक्षय खन्ना 'महाकाली' में शुक्राचार्य के रूप में।

Web Summary : अक्षय खन्ना 'महाकाली' में शुक्राचार्य के रूप में दक्षिण भारतीय सिनेमा में कदम रख रहे हैं। निर्देशक प्रशांत वर्मा ने पहला लुक जारी किया, जिसमें खन्ना औरंगजेब की भूमिका के बाद एक अद्भुत अवतार में दिख रहे हैं।

Web Title : Akshaye Khanna as Shukracharya in 'Mahakali' after Aurangzeb role.

Web Summary : Akshaye Khanna debuts in South Indian cinema as Shukracharya in 'Mahakali'. Director Prasanth Varma released the first look, showcasing Khanna in a striking, unrecognizable avatar, following his role as Aurangzeb.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.