"तेव्हा मृत्यूसाठी प्रार्थना करायचे, कारण...", लोकप्रिय अभिनेत्रीने सांगितला तिहार जेलमधील कटू अनुभव
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2026 18:56 IST2026-03-01T18:54:31+5:302026-03-01T18:56:54+5:30
"तेव्हा मृत्यूसाठी प्रार्थना केली...", तिहार जेलमध्ये असताना 'अशी' झालेली अभिनेत्रीची अवस्था, म्हणाली...

"तेव्हा मृत्यूसाठी प्रार्थना करायचे, कारण...", लोकप्रिय अभिनेत्रीने सांगितला तिहार जेलमधील कटू अनुभव
South Actress Sandeepa Vrik: अलिकडच्या काळात तिहार तुरुंगाचं नाव अभिनेता राजपाल यादवमुळे प्रचंड चर्चेत आलं होतं. तुरुंगातून बाहेर आल्यानंतर अभिनेत्याने तेथील परिस्थितीवर भाष्य केलं. अशातच त्यानंतर बॉलिवूडच्या एका लोकप्रिय अभिनेत्रीने तिहार तुरुंगातील तिच्या शेअर केलेल्या अनुभवाने सगळ्याचं लक्ष वेधून घेतलं आहे. या अभिनेत्रीचं नाव संदीपा वर्क आहे.तरुंगात गेल्यानंतर देवाकडे मी मृत्यूची प्रार्थना करत होते, असं वक्तव्य तिने एका मुलाखतीत केलं आहे. नेमकं काय घडलेलं... जाणून घेऊया...
'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' कोण?... क्लिक करून आपलं मत नोंदवा!
संदीपा वर्क ही दाक्षिणात्य इंडस्ट्रीतील चर्चेत असणारी अभिनेत्री आहे. आपल्या करिअरमध्ये तिने अनेक चित्रपट आणि जाहिरातींमध्ये काम केलं आहे. मात्र,इन्व्हेसमेन्ट स्कॅम प्रकरणामुळे तिला चार महिने तुरुंगात शिक्षा भोगावी लागली. साल २०२५ मध्ये ती तिहार तुरुंगातून तिची सुटका झाली. अलिकडेच, सिमरन मक्कर यांना दिलेल्या मुलाखतीत संदीपाने तुरुंगातील तिच्या कटू आठवणी शेअर केल्या. ती म्हणाली, "तिहार जेल हे असं ठिकाण आहे ज्याचा मी माझ्या शत्रुसाठी देखील विचार करू शकत नाही. जेव्हा मी पहिल्यांदा तिथे गेले तेव्हा मी देवाला म्हटलं मी काहीही केलेलं नाही. माझ्याच वाट्याला हे सगळं का? पहिल्या दिवशी जेव्हा मी शौचालयात गेले तेव्हा मला वाटलं, लोक म्हणतात की सर्वकाही कर्माचे परिणाम असतात. कदाचित मी माझ्या मागील आयुष्यात अनावधानाने काही चुका केल्या असतील. ज्याची शिक्षा मला मिळाली."
त्यानंतर अभिनेत्रीने तुरुंगातील तो वाईट अनुभव सांगत म्हणाली, "मी देवाकडे प्रार्थना करायचे की मला मृत्यू येऊ दे आणि यातून माझी सुटका होऊदे. सर्वात वाईट गोष्ट ही असते जेव्हा तुमच्या पालकांना तुमच्यामुळे तुम्हाला भेटण्यासाठी तुरुंगात यावं लागतं. माझ्यामुळे त्यांना तिथे यावं लागलं म्हणून मी त्यांची माफीही मागितली. त्याकाळातही माझे पालक आणि भावंडं माझ्या पाठीशी उभी राहिली कारण तुमच्या स्वतःच्या लोकांना तुम्ही खरे कसे आहात हे माहित असतं. "
मग ती म्हणाली," तिहार तुरुंगात ५०० लोकं आहेत. तिथे राहून माझी तब्येत बिघडली. तणावामुळे मी खूप खचले होते. आजही जेव्हा मी याबद्दल विचार करतो तेव्हा मला रडू येते. माझ्यासोबत असं का घडलं? तेथील स्वच्छतागृहे घाणेरडी आहेत. तुम्हाला जमिनीवर झोपावं लागतं. रोज तिच डाळ, त्याच भाज्या, चार रोट्या आणि दररोज भात. मला काहीही खाण्याची इच्छा व्हायची नाही." असं अभिनेत्रीने सांगितलं.