बॉयफ्रेंडच्या वाढदिवशीच अभिनेत्री सईने केला साखरपुडा, १२ वर्ष मोठ्या अभिनेत्यासोबत करणार लग्न
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2025 14:19 IST2025-08-30T14:15:53+5:302025-08-30T14:19:14+5:30
गणेशोत्सवाच्या मुहुर्तावर आणि बॉयफ्रेंडच्या वाढदिवशीच प्रसिद्ध अभिनेत्री सईने केला साखरपुडा. सर्वांनी तिचं अभिनंदन केलंय

बॉयफ्रेंडच्या वाढदिवशीच अभिनेत्री सईने केला साखरपुडा, १२ वर्ष मोठ्या अभिनेत्यासोबत करणार लग्न
मनोरंजन विश्वातील प्रसिद्ध अभिनेत्रीने साखरपुडा केलाय. या अभिनेत्रीने १२ वर्ष मोठ्या अभिनेत्यासोबत साखरपुडा केलाय. त्यानिमित्ताचं अभिनेत्रीचं सर्वांनी अभिनंदन केलंय. ही अभिनेत्री आहे सई धनशिका. सईच्या साखरपुड्याची बातमी सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. दाक्षिणात्य सुपरस्टार विशालसोबत तिचा साखरपुडा झाला असून, विशालने स्वतः सोशल मीडियावरून ही माहिती दिली आहे. विशेष म्हणजे विशालच्या वाढदिवशी ही आनंदाची गोष्ट घडली आहे.
विशालने दिली आनंदाची बातमी
अभिनेता विशालने त्याच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सई धनशिकासोबत साखरपुडा केल्याची घोषणा केली. विशालने इन्स्टाग्रामवर साखरपुड्याचे फोटो शेअर करत लिहिले की, “माझ्या खास वाढदिवसाच्या निमित्ताने जगाच्या कानाकोपऱ्यातून शुभेच्छा आणि आशीर्वाद दिल्याबद्दल सर्वांचे आभार. आज सई धनशिकासोबत झालेल्या माझ्या साखरपुड्याची आनंदाची बातमी कुटुंबासोबत आणि माझ्या चाहत्यांसोबत शेअर करताना मला खूप आनंद झाला. मी खूप आनंदी आहे आणि नेहमीप्रमाणेच तुमचे आशीर्वाद आणि शुभेच्छांची मला अपेक्षा आहे”
१५ वर्षांपासूनची मैत्री
विशाल आणि सई धनशिका गेल्या १५ वर्षांपासून एकमेकांना ओळखत आहेत. दोघेही खूप चांगले मित्र आहेत. या वर्षी मे महिन्यात एका कार्यक्रमात त्यांनी त्यांच्या साखरपुड्याची घोषणा केली होती. सई धनशिकाने अनेक तामिळ आणि मल्याळम चित्रपटांमध्ये काम केले आहे, पण रजनीकांत यांच्या 'कबाली' या चित्रपटातील तिच्या भूमिकेमुळे तिला जगभरात ओळख मिळाली. या चित्रपटात तिने रजनीकांतच्या मुलीची भूमिका साकारली होती. प्रेमाला वयाचं बंधन नसतं, असं म्हणतात. सई आणि विशालच्या साखरपुड्यामुळे हे सिद्ध झालं आहे.