अहमदाबाद विमान दुर्घटनेत अभिनेत्रीच्या जवळच्या व्यक्तीचा मृत्यू, पोस्ट करत व्यक्त केलं दुःख

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2025 10:22 IST2025-06-13T10:19:55+5:302025-06-13T10:22:49+5:30

अहमदाबादमध्ये विमान दुर्घटना घडली, त्यात अनेक प्रवाशांचा मृत्यू झाला

Actress Payal Ghosh's College Friend Preity Chatterjee Dies In Ahmedabad Plane Crash | अहमदाबाद विमान दुर्घटनेत अभिनेत्रीच्या जवळच्या व्यक्तीचा मृत्यू, पोस्ट करत व्यक्त केलं दुःख

अहमदाबाद विमान दुर्घटनेत अभिनेत्रीच्या जवळच्या व्यक्तीचा मृत्यू, पोस्ट करत व्यक्त केलं दुःख

अहमदाबादमध्ये विमान दुर्घटना घडली, त्यात अनेक प्रवाशांचा मृत्यू झाला. एअर इंडियाचं हे विमान २४२ प्रवाशांसह लंडनमध्ये उड्डाण करायला सज्ज होतं. परंतु काहीच सेकंदात नजीकच्या हॉस्टेलमध्ये हे विमान आदळलं आणि मोठा स्फोट झाला. बॉलिवूड जगतातील अनेक सेलिब्रिटींनी या दुःखद अपघातावर शोक व्यक्त केला.  या अपघातात अनेकांनी त्यांचे प्रियजन गमावले. त्यापैकी एक तेलुगू आणि हिंदी चित्रपट अभिनेत्री पायल घोष आहे. पायलची कॉलेजची मैत्रीण प्रीती चॅटर्जी देखील या विमानात होती. अभिनेत्रीने तिच्या मैत्रिणीच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. 

पायलने इंस्टाग्रामवर पोस्ट शेअर केली आहे.  तिनं लिहलं, "प्रीतीला श्रद्धांजली. चॅटर्जी कुटुंबासाठी सहवेदना व्यक्त करते. मला माहित होते की ती लंडनला जाणार आहे आणि ही बातमी कळताच मी लगेच तिच्या कुटुंबाशी संपर्क केला. दुर्दैवाने, त्यांच्या शांततेने सर्व काही सांगितलं. मला धक्का बसला आहे. ती माझ्या कॉलेजच्या दिवसांपासून माझी मैत्रीण आहे आणि मला विश्वास बसत नाही की ती आता नाही".

अभिनेत्री पुढे म्हणाली, "मी तिच्या आत्म्याला शांती मिळो आणि तिच्या कुटुंबाला हे दु:ख सहन करण्याची शक्ती आणि धैर्य मिळो अशी मी प्रार्थना करते. ओम शांती. माझ्या प्रार्थना फक्त तिच्यासाठीच नाहीत तर अपघातात ज्यांनी आपले प्राण गमावले आहेत, देव त्यांच्या सर्व कुटुंबांना आशीर्वाद देवो", असं तिनं म्हटलं. 

याशिवाय, शाहरुख खान, अक्षय कुमार, कंगना आणि इतर अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनी विमान अपघाताच्या घटनेवर प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. शाहरुख खानने ट्विट केले, "अहमदाबादमधील अपघाताची बातमी ऐकून मन दुखावलं... पीडितांसाठी, त्यांच्या कुटुंबियांसाठी आणि प्रभावित झालेल्या सर्वांसाठी माझ्या प्रार्थना". या घटनेमुळे सर्वांना धक्का बसला आहे. सर्वजण हळहळ व्यक्त करत आहेत.

Web Title: Actress Payal Ghosh's College Friend Preity Chatterjee Dies In Ahmedabad Plane Crash

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.