"डोळ्यात पाणी, विजयच्या दिशेने हळूहळू...", रश्मिकाच्या मैत्रिणीने सांगितला लग्नातला भावुक क्षण

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2026 12:02 IST2026-02-27T12:01:34+5:302026-02-27T12:02:25+5:30

रश्मिकाची खास मैत्रीण आणि अभिनेत्री कल्याणी प्रियदर्शनने शेअर केली पोस्ट

actress kalyani priyadarshan pens emotional moment from rashmika mandanna and vijay deverakonda wedding | "डोळ्यात पाणी, विजयच्या दिशेने हळूहळू...", रश्मिकाच्या मैत्रिणीने सांगितला लग्नातला भावुक क्षण

"डोळ्यात पाणी, विजयच्या दिशेने हळूहळू...", रश्मिकाच्या मैत्रिणीने सांगितला लग्नातला भावुक क्षण

दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय जोडी रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडा यांचा काल शाही विवाह सोहळा संपन्न झाला. तेलुगू आणि कोडवा अशा दोन्ही पारंपरिक रीतिरिवाजांनुसार या दोघांनी साताजन्माचा गाठ बांधली. ८ वर्ष डेटिंग केल्यानंतर ही जोडी आता पती पत्नी म्हणून ओळखली जाणार यामुळे त्यांचे चाहते तर भलतेच खूश आहेत. काल सगळीकडे त्यांनी पोस्ट केलेल्या लग्नाच्याच फोटोंची चर्चा होती. लग्नातील छोटे छोटे क्षण सुंदररित्या कॅमेऱ्यात कैद झाले. रश्मिकाची खास मैत्रीण आणि अभिनेत्री कल्याणी प्रियदर्शन या लग्नसोहळ्याला उपस्थित होती. रश्मिका मंडपात येत असतानाच्या क्षणाचं तिने सोशल मीडियावर वर्णन केलं आहे. 

'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' कोण?... क्लिक करून आपलं मत नोंदवा!

अभिनेत्री कल्याणी प्रियदर्शनने रश्मिका मंदानाचा लग्नाच्या फोटोंची पोस्ट शेअर करत लिहिले, "आज मी एका अत्यंत प्रेमळ मुलीला तिच्या जीवलग मित्राशी लग्न करताना पाहिले. श्वास रोखून धरणारा असा तो माहोल होता. रश्मिका हळूहळू चालत विजयच्या दिशेने येत होती आणि तो तिची वाट बघत पाठमोरा बसलेला होता. तिच्या प्रत्येक पावलाचं वजन जाणवत होतं. ती हळूवार पावलं, रोखलेला श्वास आणि डोळ्यातलं पाणी सगळं काही सांगून जात होतं."

ती पुढे लिहिते, "प्रयत्न, आदर आणि घट्ट मैत्रीने निर्माण झालेलं यांचं प्रेम पाहणं किती आनंददायी आहे. माझी प्रिय रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडा यांचं खूप खूप अभिनंदन. इथून तुमच्या एकत्रित आयुष्याची सुंदर सुरुवात होवो."

रश्मिका आणि विजय गेल्या अनेक वर्षांपासून एकमेकांना डेट करत होते. त्यांनी आपले नाते जगापासून लपवून ठेवले असले तरी, लग्नाची बातमी त्यांनी काही दिवसांपूर्वीच अधिकृतपणे जाहीर केली होती. आता त्यांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून, नेटकऱ्यांकडून 'विरोश ' जोडीवर अभिनंदनाचा वर्षाव केला जात आहे.

Web Title : आँखों में पानी, विजय की ओर धीरे-धीरे: रश्मिका की सहेली का भावुक पल।

Web Summary : रश्मिका मंदाना और विजय देवरकोंडा ने आठ साल डेटिंग के बाद पारंपरिक रीति-रिवाजों से शादी कर ली। रश्मिका की दोस्त कल्याणी प्रियदर्शन ने रश्मिका के विजय की ओर बढ़ने के भावुक पल को साझा किया, जिसे उन्होंने लुभावना और प्यार से भरा बताया।

Web Title : Tears in her eyes, slowly towards Vijay: Rashmika's friend's emotional moment.

Web Summary : Rashmika Mandanna and Vijay Deverakonda tied the knot in a traditional ceremony after eight years of dating. Rashmika's friend Kalyani Priyadarshan shared the emotional moment of Rashmika walking towards Vijay, describing it as breathtaking and filled with love.