'टॉक्झिक'च्या टीझरमध्ये साउथ स्टार यशसोबत कारमध्ये इंटिमेट सीन, कोण आहे 'ती' अभिनेत्री?
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2026 16:24 IST2026-01-09T16:24:04+5:302026-01-09T16:24:59+5:30
कोण आहे ही अभिनेत्री?

'टॉक्झिक'च्या टीझरमध्ये साउथ स्टार यशसोबत कारमध्ये इंटिमेट सीन, कोण आहे 'ती' अभिनेत्री?
साउथ स्टार यशचा 'टॉक्झिक' सिनेमा लवकरच रिलीज होणार आहे. कालच सिनेमाचा टीझर आला. यातला यशचा लूक, टॉक्झिक अवतार, दमदार म्युझिक यामुळे सिनेमाकडे सर्वांचं लक्ष वेधलं आहे. दरम्यान टीझरमध्ये यशचा कारमध्ये एका अभिनेत्रीसोबत इंटिमेट सीनही दिसतो. त्या सीनमधली ती अभिनेत्री नक्की कोण? हे आता समोर आलं आहे.
टीझरमध्ये यश 'राया' म्हणून सर्वांसमोर येतो. 'डॅडीज होम' असा त्याचा शेवटी डायलॉग आहे. दरम्यान कारमधील त्याच्या इंटिमेट सीनचीच सोशल मीडियावर जोरदार चर्चा आहे. यशसोबत दिसणारी ती अभिनेत्री कोण? असाच प्रश्न अनेकांना पडला आहे.तर ही आहे युक्रेनी अमेरिकी अभिनेत्री नताली बर्न. ती आता 'टॉक्झिक'च्या कास्टमध्ये सहभागी झाली आहे आणि निर्माती म्हणून ती काम करते. आता तिच्या भूमिकेविषयी प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.
नताली बर्नचा जन्म युक्रेनमधील कीव येथे झाला. आंतरराष्ट्रीय सिनेमांमध्ये ती अभिनेत्री आणि निर्माती म्हणून काम करते. तिने मॉडेलिंगमधून करिअरला सुरुवात केली. यातूनच ती हॉलिवूडच्या मार्गाला लागली. ती मार्शल आर्टिस्ट आणि प्रोफेशनल बॅले डान्सर आहे. तिला चार भाषा बोलता येतात.
काही दिवसांपूर्वीच 'टॉक्झिक' सिनेमातील मुख्य अभिनेत्रींचा लूक रिव्हील करण्यात आला. सिनेमात तारा सुतारिया, नयनतारा, कियारा अडवाणी, हुमा कुरेशी यांची भूमिका आहे. सध्या टीझरमधून नताली बर्न चर्चेत आली आहे. १९ मार्च रोजी 'टॉक्झिक' रिलीज होणार आहे. याच दिवशी 'धुरंधर २'ही येत आहे.