'रामायण'मधील रावण महादेवाच्या भक्तीत तल्लीन, यशनं महाकालेश्वर मंदिरात घेतलं दर्शन
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2025 17:34 IST2025-04-21T17:33:32+5:302025-04-21T17:34:40+5:30
'रामायण'चं शुटिंग सुरू करण्यापुर्वी यशनं महाकालेश्वर मंदिरात दर्शन घेतलं.

'रामायण'मधील रावण महादेवाच्या भक्तीत तल्लीन, यशनं महाकालेश्वर मंदिरात घेतलं दर्शन
दाक्षिणात्य मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता यश (Yash) हा सर्वोत्कृष्ट अभिनेत्यांमध्ये एक आहे. सिनेसृष्टीत 'रॉकी भाई', 'रॉकिंग स्टार' या नावाने यशला ओळखला जातं. दमदार अभिनयाच्या जोरावर त्यानं मोठा चाहतावर्ग जमवला आहे. यशनं आतापर्यंत फक्त दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये काम केलं असलं तरी तो लवकरच बॉलिवूडमध्येही धमाकेदार पदार्पण करणार आहे. नितेश तिवारी यांच्या आगामी पौराणिक चित्रपट 'रामायण' मध्ये यश रावणाची भूमिका साकारणार आहे. अभिनेता लवकरच या चित्रपटाचे शुटिंग सुरू करणार आहे. अशातच शूटिंगपूर्वी यशनं महादेवाचं आशीर्वाद घेतलेत.
यश उज्जैनमधील महाकालेश्वर मंदिरात पोहचला आणि दर्शन घेतलं. यावेळी त्यानं मनोभावे महादेवाची आरती केली. मंदिरातील अभिनेत्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. एएनआयशी बोलताना यशने महाकालेश्वर मंदिराला भेट दिल्याबद्दल आनंद व्यक्त केला. तो म्हणाला, "मी खूप आनंदी आहे. मला भगवान महादेवांचा आशीर्वाद हवा होता. मी लहानपणापासूनच महादेवांचा खूप मोठा भक्त आहे".
#WATCH | Madhya Pradesh: Actor Yash offered prayers at Mahakaleshwar Jyotirlinga Temple in Ujjain. pic.twitter.com/6ou0YPWQow
— ANI (@ANI) April 21, 2025
दरम्यान, सध्या सर्वांना नितेश तिवारींच्या 'रामायण' सिनेमाची उत्सुकता आहे. 'रामायण'साठी दिग्दर्शक नितेश तिवारी चांगलीच तयारी करत आहेत. 'रामायण' सिनेमात कलाकारांची मोठी फौज आहे. अभिनेता रणबीर कपूर हा प्रभू श्रीरामांची भूमिका साकारतोय, तरसाई पल्लवी माता सीतेच्या भूमिकेत दिसणार आहे. 'रामायण'शिवाय यशचा 'टॉक्सिक' चित्रपटही प्रदर्शित होणार आहे. यशच्या चित्रपटात एक दोन नाही तर चार अभिनेत्री आहेत.